Wipro चा फेशर्संना मोठा धक्का; वार्षिक पगारात ५० टक्क्यांनी कपात | पुढारी

Wipro चा फेशर्संना मोठा धक्का; वार्षिक पगारात ५० टक्क्यांनी कपात

पुढारी ऑनलाईन: आर्थिक मंदीचे कारण देत IT कंपन्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात नोकर कपातीचे धोरण अवलंबत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनेक कंपन्यांनी पगार कपात करण्यास देखील सुरूवात केली आहे. IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने फेशर्सच्या बाबतीत देखील नवीन धोरण अवलंबले आहे. नव्याने कंपनीत समाविष्ट होणाऱ्या व्यक्तींच्या पगारात ५० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय विप्रोने घेतला आहे.

एका ईमेलमध्ये, विप्रो कंपनीने फ्रेशर्सना सुरुवातीला जो पगार ऑफर केला होता, त्यापेक्षा जवळपास ५० टक्के कमी पगारावर हजर  होण्यास सांगितले आहे. म्हणजेच बंगळुरू स्थित IT सेवा कंपनी विप्रोने ज्या उमेदवारांना अलीकडेच वार्षिक 6.5 लाख रुपये (LPA) पॅकेज ऑफर केले होते. त्या फ्रेशर्संना आता 3.5 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज स्वीकारतील का? अशी विचारणा केली आहे. त्यामुळे नव्याने विप्रो या आयटी कंपनीतील अनेक कर्मचारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

विप्रो या टेक कंपनीने या बदलांसाठी सध्याचे मार्केटमधील असलेल्या आर्थिक वातावरणाला जबाबदार धरले आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना, फ्रेशर्सना किमान त्यांचे कौशल्य तयार करण्याची आणि अधिक चांगले शिकण्याची संधी मिळत असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by India Today (@indiatoday)

आयटी कर्मचारी संघटना NITES ने विप्रोने उचलेले हे पाऊल ‘अन्याय’ आणि ‘अस्वीकार्य’ असल्याचे म्हणत, या विप्रो या आयटी कंपनीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. विप्रोचा निर्णय जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपन्यांसमोरील आर्थिक अनिश्चितता आणि आव्हाने प्रतिबिंबित असल्याचेही येथील अनेक उद्योग निरीक्षकांनी देखील म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button