India Russia Relations : जगाला धमकावत असताना पुतीन यांनी भारताला घेऊन केला मोठा खुलासा

India Russia Relations : जगाला धमकावत असताना पुतीन यांनी भारताला घेऊन केला मोठा खुलासा
Published on
Updated on

मॉस्को; पुढारी ऑनलाईन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबतच्या युद्धाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले. राजधानी मॉस्कोमधील गोस्टिव्हनी ड्वोर हॉलमध्ये आपल्या भाषणादरम्यान पुतिन म्हणाले की, नाझींच्या धमक्यांशी सतत लढा देणारा रशिया युक्रेनमध्ये 'स्पेशल ऑपरेशन' बजावत आहे. पुतीन यांनी आपल्या भाषणात भारताचा ठळकपणे उल्लेख केला आणि रशिया भारतासोबतचे सहकार्य आणि व्यापार वाढवत राहील असे सांगितले. (India Russia Relations)

आशियातील भारत, चीन इत्यादी देशांसोबत व्यापाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण कॉरिडॉरचा (INSTC) विस्तार करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. रशिया परकीय आर्थिक संबंधांचा विस्तार करेल आणि नवीन लॉजिस्टिक कॉरिडॉर तयार करेल, असे रशियाचे अध्यक्ष म्हणाले. (India Russia Relations)

भारत, इराण, चीन, पाकिस्तान या देशांशी आर्थिक संबंध वाढवण्यासाठी उत्तर-दक्षिण कॉरिडॉर विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर भर देताना पुतिन म्हणाले, 'आम्हाला भारत, इराण, पाकिस्तानसोबत सहकार्य वाढवण्याची आशा आहे. भारतासोबतच्या व्यापाराला चालना देण्यासाठी आम्ही उत्तर-दक्षिण कॉरिडॉर (INSTC) तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहू. (India Russia Relations)

आपल्या योजनेबद्दल बोलताना पुतिन पुढे म्हणाले, 'रेल्वेचे आधुनिकीकरण आणि उत्तरेकडील शिपिंग मार्गांमध्ये सुधारणा हा देखील आमच्या योजनेचा भाग आहे. आम्ही ब्लॅक आणि अझोव्ह सागरी मार्गांची बंदरे, उत्तर-दक्षिण कॉरिडॉर विकसित करू आणि उत्तर सागरी मार्गाची क्षमता वाढवू. यामुळे चीन, भारत, इराण आणि इतर मित्र देशांसोबतचे सहकार्य वाढेल आणि अधिक दृढ होईल. (India Russia Relations)

काय आहे INSTC प्रोजेक्ट ?

बिझनेस स्टँडर्डमधील एका अहवालानुसार, मालवाहतुकीचा खर्च आणि वेळ वाचवण्यासाठी भारत आणि रशिया दरम्यान INSTC म्हणजेच आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर सुरू करण्यात आला आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या म्हणण्यानुसार, या कॉरिडॉर अंतर्गत, भारत आणि रशिया दरम्यानचा वाहतूक खर्च सुमारे 30 टक्क्यांनी कमी करण्याचा आणि समुद्र, रेल्वे आणि रस्ता वापरून 40 दिवसांवरून जवळपास निम्म्यापर्यंत कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

INSTC हा भारत, इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपमधील मालवाहतुकीसाठी 7,200 किमी लांबीचा परिवहन प्रकल्प आहे. या कॉरिडॉरची पायाभरणी रशिया, इराण आणि भारत यांनी मिळून १२ सप्टेंबर २००० रोजी केली होती.

पुतिन यांना आता या कॉरिडॉरच्या विकासावर लक्ष केंद्रित करून इंडो-पॅसिफिक प्रदेशातील देशांसोबत, विशेषत: भारतासोबतचे सहकार्य आणखी मजबूत करायचे आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news