Rajeshwari Kharat : सेक्सी ‘शालू’चे घायाळ करणारे फोटो पाहिलेत का? | पुढारी

Rajeshwari Kharat : सेक्सी 'शालू'चे घायाळ करणारे फोटो पाहिलेत का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी मनोरंजन विश्वात भलेही ‘फॅंड्री’फेम राजेश्वरीला (Rajeshwari Kharat) आपले पाय भक्कम करता आले नसतील. पण, सोशल मीडियावर राजेश्वरीने आपल्या सुंदरतेच्या आणि मादक अदाकारीच्या जोरावर फाॅलोअर्स संख्या ही एखाद्या प्रस्थापित सेलिब्रिटीही मागे पडतील, इतकी वाढवलेली आहे.

Rajeshwari

राजेश्वरीच्या (Rajeshwari Kharat) सेक्सी फोटोंवर फाॅलोअर्सचा प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. त्यात अनेकदा ती ट्रोलदेखील होते. पण, ती ट्रोलर्सकडे दूर्लक्ष करते. आणि रोज एखादा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते.

फॅंड्रीमधून राजेश्वरीने चित्रपट विश्वात प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने शालू नावाचं पात्र साकारलेलं होतं. या चित्रपटामध्ये तिला कोणताही डायलाॅग नसतानाही ती प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडून गेली.

Rajeshwari

राजेश्वरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे फेसबुक पेजला तब्बल ३ लाख ६७ हजार लोकांनी फाॅलो केलं आहे, तर इन्स्टाग्रामवर तिचे २ लाख १८ हजार फाॅलोअर्स आहेत. ती आपल्या फोटोंमधून मादक अदा दाखवून चाहत्यांना घायाळ करते.

 

इतकंच नाही, तर व्हिडीओ करत चाहत्यांना खिळवूनही ठेवते. फँड्री चित्रपटात साधीभोळी आणि दोन वेण्या घालून शाळेत जाणारी शालू म्हणजेच राजेश्वरी बोल्ड व्हिडिओ करते तेव्हा चाहते तिच्या व्हिडीओवर काॅमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडतात. अर्थात या या काॅमेंट्स पाॅझिटिव्ह आणि निगेटिव्हही असतात.

Rajeshwari

“चोरी चोरी सपनोमें आता है कोई… सारी सारी रात जगाता है कोई…” या गाण्यावर राजेश्वरी नुकतीच थिरकली. नेहमीसारखंच या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा धुमाकूळ उडवून दिला. काही चाहते तिला तुझ्या स्वप्नात कोण येत आहे? त्याचं नाव जाहीर कर, अशी विचारणा करताना दिसत आहेत.

 

२२ वर्षांची असणारी ही राजेश्वरी सोशल मीडियावर जाळ अन् धूर संगटच काढते, त्याच्या सेक्सी अदा पाहून चाहत्यांनाही तिच्या फोटोंवर व्यक्त होण्याचा मोह आवरता येत नाही. पूर्वी सोज्वळ, साधी असणारी राजेश्वरीने कोणतीही पार्श्वभूमी नसताना चाहत्यांच्या मनात घर तयार केले आहे.

Back to top button