माहितीनूसार उत्तर तुर्कस्थानमधील बार्टिनच्या काळ्या समुद्र किनारी भागातील अमासरा शहरातील सरकारी टीटीके अमासरा मुसेसे मुदुरलुगु कोळसा खाणीत हा भीषण स्फोट झाला. यादरम्यान या कोळसा खाणीत ११० लोक होते. यापैकी २२ जणांचा मृत्यू झाला आहे. १७ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर या १७ पैकी ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आम्ही मदत व बचावकार्य सुरू केल्याची माहिती तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी दिली आहे. हा स्फोट नेमक कशामुळं झाला हे अद्याप समजलेलं नाही. पण कोळशाच्या खाणींमध्ये मिथेन स्फोटक मिश्रण तयार करणाऱ्या फायरडॅम्पमुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज ऊर्जा मंत्री फातिह डोनमेझ यांनी वर्तवला जात आहे.