Earthquake in Turkey:तुर्कस्तान भूकंपाने हादरले, तुर्की, सीरियात ५२१ हून अधिक जणांचा मृत्यू | पुढारी

Earthquake in Turkey:तुर्कस्तान भूकंपाने हादरले, तुर्की, सीरियात ५२१ हून अधिक जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये ७.८ रिश्टर तिव्रतेच्या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या भूकंपात आतापर्यंत किमान ५२१ हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 2323 हजारहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.  या जोरदार भूकंपामने तुर्कस्तानसह सीरिया, लेबनॉन इस्रायल या शेजारील देशांनाही धक्के बसले आहेत. त्यामुळे  मृतांचा आकडा आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची  शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली जात आहे.

तुर्कस्तानला आज (दि.६) सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के बसले. यात ५२१ हून अधिक तुर्की नागरिकांचा (Earthquake in Turkey) मृत्यू झाला, तर अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने मध्य तुर्कस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता ७.८ एवढी असल्याचे नोंदवले आहे. या जोरदार भूकंपामुळे तुर्कीची राजधानी अंकारा आणि लेबनॉन, सीरिया, सायप्रससह इतर शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

आग्नेय तुर्कस्तानमधील गझियानटेपजवळ ७.८ तीव्रतेचा भूकंप झाला, असे यूएस भूगर्भीय सेवेने सांगितले. नूरदगीपासून २३ किमी पूर्वेला भूकंपाचे केंद्रस्थान आहे. भूकंपात आत्तापर्यंत ५२१ हून अधिक लोकांचा मृत्यू, तर अनेक इमारती कोसळल्या असल्याचे सॅनलिउर्फाचे महापौर यांनी सांगितले. तुर्कस्तानमधील या प्राणघातक भूकंपानंतर बचाव कार्य सुरू असल्याचा व्हिडिओ रॉयटर्सने ट्विट केला आहे.

यापूर्वीच्या भूकंपात 30,000 हून अधिक जणांचा मृत्यू

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, सोमवारी पहाटे दक्षिण तुर्कीमध्ये झालेला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप हा देशाने गेल्या 100 वर्षांमधील रेकॉर्डमधील सर्वात शक्तिशाली अनुभवलेला भूकंप आहे. यूएसजीएसने म्हटले आहे की, 1939 मध्ये पूर्व तुर्कस्तानला झालेल्या ७.८ तीव्रतेच्या भूकंपात 30,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

संकंट अद्याप टळले नाही

जॉर्जिया टेक युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ अर्थ अँड अॅटमॉस्फेरिक सायन्सेसचे सहाय्यक प्राध्यापक कार्ल लँग यांनी सीएनएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनूसार, सोमवारी (दि.०६) मध्य तुर्कस्थान आणि शेजारील भागांवरील भूकंपाचे संकंट अद्याप टळलेले नाही. या भागात अजूनही भूकंपाचा धोका असल्याचे या प्राध्यपकांनी म्हटले आहे.

Back to top button