अनादिकाळापासून आईपेक्षा वडील वयाने मोठेच! संशोधनाचा निष्कर्ष | पुढारी

अनादिकाळापासून आईपेक्षा वडील वयाने मोठेच! संशोधनाचा निष्कर्ष

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : वडील आईपेक्षा वयाने मोठेच असतात, पण या प्रघाताचा इतिहास किती जुना आहे, याचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला असून, त्यातून धक्कादायक निष्कर्ष उजेडात आला आहे. आजही सर्वदूर पाळली जाणारी ही प्रथा तब्बल अडीच लाख वर्षे जुनी आहे!

पुरुष आणि स्त्रियांनी प्रजननास नेमकी कोणत्या वयात सुरुवात, याबाबत अमेरिकेतील ब्लूमिंग्टन येथील इंडियाना युनिव्हर्सिटीचे संशोधक मॅथ्यू हॅन यांच्यासह काही शास्त्रज्ञांनी संशोधन केले. या संशोधनाचा अहवाल नुकताच सायन्स अॅडव्हान्सेस या आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. मॅथ्यू सांगतात, आई-वडिलांनी मुलांमध्ये जे डीएनए सोडले, त्यांचा अभ्यास आम्ही केला. त्यानंतर हेच सूत्र आपल्या पूर्वजांनी प्रजनन कधी सुरू केले, याचा शोध घेण्यासाठी वापरले. गेल्या अडीच लाख वर्षांपेक्षा अधिक काळापासून २६.९ वर्षे वयापासून मानव प्रजनन करीत आला आहे, असे त्यातून सिद्ध झाले. प्राचीन मानवाला होमो सेपियन संबोधले जाते. सरासरी होमो सेपियन वडील हे नेहमीच सरासरी होमो सेपियन आईपेक्षा वयाने मोठे असल्याचे अभ्यासादरम्यान लक्षात आले. पुरुष ३०.७ वर्षांचे असताना वडील होतात, तर स्त्रिया २३.२ वर्षे वयात आई होतात, असा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

वयातील फरक घटला

गेल्या पाच हजार वर्षांपासून मात्र आई आणि वडील यांच्यातील वयाचा फरक वेगाने घटला आहे. या काळात स्त्रियांचे आई होण्याचे सरा- सरी वय २८ झाले आहे. अर्थात, काही लाख वर्षांच्या इतिहासात असे बदल काही काळाप- रते होतच आले आहेत पण आईचे वडील वडिलांपेक्षा कमी, हे सूत्र पूर्वापार चालत आले आहे. संशोधक सांगतात की, नोंदणीकृत इतिहासाद्वारे अलीकडच्या काही हजार वर्षांचीच माहिती समोर येते, परंतु पूर्वजांचेच गुणसूत्र (डीएनए) आपल्या शरी- रात आजही आहेत. त्या आधारे आम्ही वयाबद्दलच्या गुपितांची माहिती मिळविली.

Back to top button