Goldman Sachs start layoffs | आर्थिक मंदीचे संकट अधिक गडद! ‘या’ दिग्गज कंपनीकडून ३,२०० जणांना नारळ

Goldman Sachs start layoffs | आर्थिक मंदीचे संकट अधिक गडद! ‘या’ दिग्गज कंपनीकडून ३,२०० जणांना नारळ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्थिक मंदीमुळे आणखी एक मोठी कंपनी नोकरकपात करत आहे. गोल्डमन सॅच ही कंपनी सुमारे ३ हजार लोकांना (Goldman Sachs start layoffs) कामावरुन कमी करणार आहे. याबाबत एका सुत्रांच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. गोल्डमन सॅच ग्रुप बुधवारपासून त्यांच्या फर्ममधील हजारो नोकऱ्या कमी करण्यास सुरुवात करेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. कंपनी आर्थिक मंदीचा सामना करत असून यामुळे नोकरकपात केली जात असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. गोल्डमन सॅच ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, या कंपनीतून ३ हजारांहून अधिक जणांना काढले जाणार आहे. पण नेमका आकडा अद्याप निश्चित केलेला नाही. दरम्यान, गोल्डमन सॅचने यावर कसलीही टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. याआधीच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की गोल्डमन सॅच तिसर्‍या तिमाहीच्या अखेरीस त्यांच्या ४९,१०० कर्मचाऱ्यांपैकी ३,२०० पदांची कपात करेल. कोरोना महामारी दरम्यान केलेल्या नोकरभरतीचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले आहे.

Goldman Sachs त्यांच्या गुंतवणूक बँकिंग विभागात नोकरकपात करणार असल्याचे समजते. तसेच या नोकरकपातीचा परिणाम बहुतेक प्रमुख विभागांनादेखील होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, व्यवसायातील तोट्यामुळे शेकडो जणांना कामावरुन कमी केले जाणार आहे. एका रिपोर्टनुसार, त्यांचे २०२२ मध्ये गुंतवणूक बँकिंग शुल्क एका वर्षापूर्वी १३२.३ अब्ज डॉलरवरून जवळपास निम्म्यावर म्हणजे ७७ अब्ज डॉलरवर आले आहे. डिसेंबर २०२० पर्यंत विलीनीकरण आणि अधिग्रहणांचे एकूण मूल्य ३७ टक्क्यांनी घसरून ३.६६ ट्रिलियन डॉलरवर आले आहे.

जगभरात सध्या नोकरकपातीची लाट सुरु आहे. गोल्डमन सॅचसह फास्ट-फूड चेन मॅकडोनाल्ड्स, व्हिडिओ-होस्टिंग प्लॅटफॉर्म Vimeo, सॉफ्टवेअर कंपनी सेल्सफोर्स, टेक कंपनी मेटा, ट्विटर आणि अॅमेझॉन यांनी याआधीच नोकरकपातीची घोषणा केली आहे. या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कमी केले आहे. (Goldman Sachs start layoffs)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news