Three minutes exercise : रोजचा तीन मिनिटांचा व्यायामही लाभदायक

Three minutes exercise
Three minutes exercise

लंडन : शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायामाची (Three minutes exercise) नितांत गरज असते. चांगल्या आरोग्यासाठी साधारणपणे आठवड्यात 150 मिनिटे हलका किंवा 75 मिनिटांच्या व्यायामाला आदर्श मानले गेले आहे; मात्र नुकत्याच आलेल्या एका संशोधनानुसार, एका दिवसात जर 1-1 मिनिटाचा थकवा येणारा व्यायाम केला तरी तो आरोग्यासाठी चांगला राहतो. आठवड्यात फक्त 15 मिनिटे व्यायाम करणारे लोकदेखील दीर्घायुष्य जगू शकतात.

तीन मिनिटांचा व्यायाम (Three minutes exercise) म्हणजे वेगाने धावणे, सायकल चालवणे. युरोपियन हार्ट जर्नलच्या मते, व्यायामात असा एक असा व्यायाम चांगला मानला जातो, त्यामध्ये व्यायाम करताना किंवा श्वास घेताना बोलताही येत नाही. यामध्ये वेगाने धावणे, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (एचआयआयटी), वेगवान सायकलिंग यासारख्या व्यायामांचा समावेश आहे. जे लोक आठवड्यातून 15 मिनिटे जोरदार व्यायाम करतात, त्यांना कर्करोगाचा धोका 15 टक्के कमी असतो, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news