मुख्यमंत्री योगींनी मुंबईतून मिळवली तब्बल 5 लाख कोटींची गुंतवणूक | पुढारी

मुख्यमंत्री योगींनी मुंबईतून मिळवली तब्बल 5 लाख कोटींची गुंतवणूक

मुंबई; पुढारी डेस्क :  एकीकडे देश-विदेशातून नवी गुंतवणुक आणि प्रकल्प आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोनच दिवसांच्या मुंबई दौर्‍यातून तब्बल 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली.
मुख्यमंत्री योगी बुधवारी रात्री मुंबईत दाखल झाले. उत्तर प्रदेशच्या स्थलांतरीत नागरिकांशी त्यांनी संवाद साधला आणि रोड शो केला. योगी यांनी विविध उद्योजक आणि बॉलीवूडच्या निर्मार्त्यांच्या भेटी घेत पाच लाख कोटींची गुंतवणूक मिळवली. मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह, गौतम अदानी यांचा अदानी समूह, टाटा, पिरामल, गोदरेज, वेदांत, पार्ले, हिंदुजा, लोढा यांच्यासह 24 हून अधिक उद्योगपतींनी योगी यांची भेट घेतली.

अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन

अयोध्या येथे प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी येणार्‍या महाराष्ट्रातील भक्तांसाठी महाराष्ट्र भवन बांधण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. ही मागणी त्यांनी मान्य केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण लवकरच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौर्‍यावर येणार असल्याचेही सांगितले. त्यावर योगी यांनी समाधान व्यक्त केले.

Back to top button