पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या टेस्लाच्या एलॉन मस्क यांच्या महत्त्वकांक्षा दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. तरी सुद्धा ते त्यांच्या निर्णय पद्धतीमुळे व महत्त्वकांक्षेमुळे दररोज चर्चेत आहेत. आता या पुढच्या अध्यायात अॅपल कंपनीची एन्ट्री झाली आहे. असे म्हटले जात आहे की, ट्विटर नंतर आता त्यांची नजर इतर कंपन्यांवर आहे. आता एलॉन मस्क आणि ॲपलमध्ये खटके उडले आहेत आणि मस्क याने त्यांना धमकी वजा इशारा सुद्धा दिला आहे. त्यामुळे आता सर्वत्र एलॉन मस्क आणि ॲपल यांची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे ट्विटरनंतर मस्क यांनी ॲपलकडे मोर्चा वळवला की काय? अशी शंका घेण्यास लोकांनी सुरुवात केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या नेमके हे काय आहे हे प्रकरण आणि मस्क यांच्या डोक्यात नेमकं काय शिजतयं. (Elon Musk And Apple)
मस्क यांच्या म्हणण्यानुसार, अॅपलने ट्विटरला आपल्या अॅप स्टोअरमधून काढून टाकण्याची धमकी दिली आहे. इलॉन मस्क यांना वाटते की Appleपल त्यांचे अॅप प्ले स्टोअरवर ब्लॉक करू शकते. ॲपल आपल्यावर सतत दबाव टाकत असल्याचा आरोपही एलॉन मस्कने यांनी केला आहे.
ॲपलने ट्विटरवरील जाहिराती केल्या कमी
मस्क यांनी सोमवारी असा आरोप केला की ॲपलने "मुख्यतः ट्विटरवरील जाहिराती थांबवल्या आहेत." ऍपलचे सीईओ टिम कुक यांना टॅग करत ट्विट केले की, "ते अमेरिकेत भाषण स्वातंत्र्याचा तिरस्कार करतात का?" (Elon Musk And Apple)
ॲपलने ट्विटरवर आपल्या जाहिरातींची संख्या निम्मी केली आहे. गेल्या महिन्यात, 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान, ॲपलने ट्विटरवर 2,20,800 डॉलरच्या जाहिरात दिल्या होत्या. त्यानंतर 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान ही संख्या 1,31,600 डॉलर इतकी खाली आली आहे. (Elon Musk And Apple)
ॲपलशी करणार युद्ध : मस्क
पण, ट्विटर आणि अॅपलमधील हा वाद नवा नाही. ॲपल त्यांच्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या जाहिरातींवर 30% कर घेते. पण, हा कर ते अशा डेव्हलपर्सकडून घेतात जे या ॲपस्टोअरच्या माध्यमातून वर्षाकाठी एक मिलियन म्हणजे सुमारे आठ कोटी रुपयांपर्यंत कमाई करतात. ट्विटरने अशा कर वसुलीला विरोध केला होता. आता मस्क यांनी ट्विटर हाती घेतल्यावर पुन्हा हा मुद्दा वर काढत म्हणाले की, कमिशन देण्यापेक्षा मी ॲपलशी युद्ध करण्यास तयार आहे.
या वादात मस्क यांनी गुगलला ओढले
या वादात मस्क यांनी गुगलला सुद्धा ओढून घेत म्हणाले की, ॲपल आणि गुगल या दोघांनाही नुकसानकार अथवा अपमानकारक कंटेटला नियंत्रीत करण्यासाठी ॲप स्टोअरवर सोशल नेटवर्किंगची आवश्यकता आहे. स्वत:ला भाषण स्वातंत्र्याचे समर्थक म्हणून घेत एलॉन मस्क यांना कायद्याच्या कक्षेत ट्विटरवर सर्व प्रकारच्या कंटेटला परवानगी दिली पाहिजे असे वाटते.
स्मार्टफोन काढण्याचा इशारा
याआधी त्यांनी स्वतःच आपला स्मार्टफोन लॉन्च करण्याबाबत वक्तव्य केले होते. जर दोन्ही प्लॅटफॉर्मवरुन ट्विटरला ॲप स्टोअरवरुन काढून टाकल्यास टेक कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या भांडणाचा परिणाम काय होईल हे पाहणे खरोखरच उत्सुकतेचे राहणार आहे.
अधिक वाचा :