Elon Musk Affair : मस्क यांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली होती गुगलच्या सह-संस्थापकाची पत्नी? | पुढारी

Elon Musk Affair : मस्क यांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली होती गुगलच्या सह-संस्थापकाची पत्नी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्याबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांच्यामुळे गुगलचे (Google) सह-संस्थापक सेर्गे ब्रिन (Sergey Brin) यांनी पत्नी निकोल शनहान (Nicole Shanahan) हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. एलॉन मस्क आणि ब्रिन यांची पत्नी निकोल यांचे गेल्या वर्षभरापासून अफेअर होते अशी चर्चा सुरू असतानाच मस्क यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. सर्गेई आणि मी मित्र आहोत आणि काल रात्री एकत्र पार्टीत होतो. मी निकोलला तीन वर्षांत फक्त दोनदा पाहिले आहे. आमच्यात असं काही नाही, असा खुलासा मस्क यांनी दिला आहे. (Elon Musk Affair)

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गूगल (Google)चे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन आणि त्यांची पत्नी निकोल शनहान यांच्यात घटस्फोट होणार आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्याशी निकोलचे अफेअर सुरू असल्याच्या कारणामुळे सेर्गे ब्रिन यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे समजते आहे. मात्र आता मस्क यांनी या वृत्ताला निराधार म्हटले आहे. (Elon Musk Affair)

2008 मध्ये आर्थिक संकटात इलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाला बुडण्यापासून वाचवणारे सेर्गे ब्रिन हे आपल्याला सांगतो. रविवारी, इलॉन मस्कचे सर्गेई ब्रिनच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा अहवाल समोर येताच, एकच खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी अशीही बातमी आली होती की एलोन मस्कच्या जुळ्या मुलांचा पर्दाफाश झाला होता, ज्यांची आई त्याच्या कंपनीत काम करणारी महिला कर्मचारी होती. (Elon Musk Affair)

यांनी 2008 साली आर्थिक संकटात सापडलेल्या

2008 मध्ये एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आर्थिक संकटात सापडली होती. त्यावेळी गूगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन मस्क यांच्या मदतीला धावून गेले होते. एका रिपोर्टनुसार, ब्रिन यांनी त्यावेळी टेस्लामध्ये मोठी गुंतवणूक केली. पण कालांतराने चित्र बदलले. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, 242 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 94.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ब्रिन या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. (Elon Musk Affair)

त्यातच ब्रिन यांच्या पत्नीसोबत एलॉन मस्क यांचे अफेयर सुरू असल्याचे समोर येताच खळबळ माजली होती. काही दिवसांपूर्वी अशीही माहिती समोर आली होती की, मस्क यांना दोन जुळे मुले आहेत आणि त्या मुलांची आई मस्क यांच्याच कंपनीत काम करणारी एक महिला कर्मचारी होती. त्या वृत्तानंतर उद्योग जगतात जोरदार चर्चा रंगली होती.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, एलॉन मस्क आणि ब्रिन दीर्घकाळापासून मित्र होते. मस्क अनेक वर्षांपासून ब्रिन यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील घरी नियमितपणे भेट देत असत. या काळात मस्क यांची निकोलशी जवळीक वाढली. या बातमीनंतर सर्जी ब्रिन यांनी सल्लागारांना अलीकडच्या काही महिन्यांत एलोन मस्कच्या कंपन्यांमधील त्यांची वैयक्तिक गुंतवणूक विकण्याची सूचना केली. मस्क यांच्या कंपन्यांमध्ये ब्रिन यांची नेमकी किती गुंतवणूक आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

Back to top button