Live tweeting feature : ट्विटरवर आले नवे ‘लाईव्ह ट्विटिंग फीचर’

Live tweeting feature
Live tweeting feature
Published on
Updated on

वॉशिंग्टन : एलन मस्क यांची मालकी आल्यापासून ट्विटर सातत्याने वेगवेगळ्या कारणामुंळे चर्चेत असते. आता ट्विटरवर एक नवे फीचर (Live tweeting feature) आले असून आता 'लाईव्ह ट्विटिंग'ची सुविधा यूजरना मिळाली आहे. ट्विटरवर हे नवीन फीचर लाईव्ह करण्यापूर्वी अ‍ॅलन मस्क यांनी स्वत: यूजर्सना याबाबत माहिती दिली. मस्क यांनी ट्विट केले की, लाईव्ह ट्विटिंग फीचर आता प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्टिव्ह झाले आहे. ट्विटरवरील 'लाईव्ह ट्विटिंग' फीचरच्या माध्यमातून यूजर्स ट्विटरवर सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान सहज ट्विट करू शकतील. तसेच वापरकर्ते त्यांचा ट्विट थ्रेड इव्हेंटच्या मध्यभागी जोडू शकतात आणि व्ह्यू मिळवू शकतात.

अ‍ॅलन मस्क मायक्रो-ब्लॉगिंग साईटवरील कंटेट बदलाबाबत यूजर्सकडून सल्ला देखील घेत आहेत. ट्विटरवर अनेक यूजर्सनी कॅरेक्टर लिमिट, व्हर्च्युअल जेल आणि फ्री स्पीच संदर्भात विविध सूचना दिल्या आहेत. लेखक मॅट टॅबी हे लाईव्ह ट्विटिंग फीचर (Live tweeting feature) वापरणारे पहिले ट्विटर यूजर बनले आहेत. ट्विटरवर एका यूजरने इलॉन मस्कला व्हर्च्युअल जेल बनवण्याचा सल्ला ला आहे.

जर कोणत्याही यूजर्सने कंपनीची पॉलिसी किंवा नियम तोडले, तर त्या लोकांच्या प्रोफाईलवर जेल आयकॉन (Live tweeting feature) येईल आणि ते ट्विटरच्या व्हर्च्युअल जेलमध्ये गेल्यानंतर ट्विट करू शकणार नाहीत, तसेच इतर कोणत्याही ट्विटवर लाईक किंवा कमेंट करू शकणार नाहीत. एका वापरकर्त्याने मस्कला ट्विटरची शब्द मर्यादा 1,000 पर्यंत वाढवण्याची सूचना केली, त्यावर मस्क म्हणाले की ते आमच्या यादीत आहे, त्यावर विचार केला जाईल.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news