Tesla Layoffs - एलन मस्क यांना मंदीची झळ; टेस्लातून होणार नोकरकपात | पुढारी

Tesla Layoffs - एलन मस्क यांना मंदीची झळ; टेस्लातून होणार नोकरकपात

चीनमधून कारची मागणी घटण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन – अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीलाही मंदीची झळ बसू लागली आहे. या कंपनीत नोकरभरती थांबली असून पुढील तिमाहित नोकरकपात केली जाणार आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. इलेक्ट्रेक या वेबसाईटच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. यापूर्वी मस्कच्या मालकीच्या ट्विटरमधून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली आहे. (Tesla Layoffs)

काही महिन्यांपूर्वी मस्क यांनी सोशल मीडिया साईट ट्विटर विकत घेतली. त्यानंतर त्यांचे बराचसा वेळ ट्विटरच्या कामकाजात जाऊ लागल्याने टेस्लातील गुंतवणूकदारांनी नाराजी व्यक्त केली होती. तर शेअर बाजारातील विश्लेषकांनी टेस्लाचे शेअर घसरतील अशा प्रकारचे भाकित व्यक्त केले. तर दुसरीकडे पुढील वर्षी चीनमधून इलेक्ट्रिक कारसाठी मागणी कमी राहील, असा अंदाज आहे.

एलन मस्क यांनी जून महिन्यात मस्क यांनी टेस्लातील कर्मचाऱ्यांचे पगार १० टक्क्यांनी कमी केले जातील असे जाहीर केले होते. अॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, शाओमी अशा मोठ्या कंपन्यातून नोकरकपात झालेली आहे.

हेही  वाचा

Back to top button