Twitter Blue subscription | …तर ट्विटरच्या सर्व व्हेरिफाइड अकाउंट्सच्या ब्लू टिक जाणार, एलन मस्क यांचा इशारा | पुढारी

Twitter Blue subscription | ...तर ट्विटरच्या सर्व व्हेरिफाइड अकाउंट्सच्या ब्लू टिक जाणार, एलन मस्क यांचा इशारा

पुढारी ऑनलाईन : ट्विटर ब्ल्यू टिक आणि ट्विटर अकाउंट्स व्हेरिफिकेशन सेवा पुन्हा मंगळवारपासून सुरू करण्यात आली. यानंतर एलन मस्क यांनी येत्या काही महिन्यात व्हेरिफाइड अकाउंटसवर पैसे न भरल्यास त्यांना ब्ल्यू टिक गमवावी लागणार असल्याचा इशारा ट्विटर यूजर्संना दिला आहे. ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी यूजर्सला 8 डॉलर्स इतकी रक्कम द्यावी लागणार आहे. तर Apple डिव्हाइसवर Twitter अॅप वापरणाऱ्यांसाठी आणि ब्ल्यू टिक असणाऱ्यांना 11 डॉलर्स सबस्क्रिप्शन चार्ज घेण्यात येणार असल्याचेही ट्विटरने ट्विट करत स्पष्ट केले आहे.

ट्विटरचे मालक एलन मस्क यांच्या ट्विटरवर नेहमीच नवीन नियम पाहायला मिळत आहेत. Twitter मधील पडताळणी नियम रद्द करण्यात आले आहेत. यानंतर मस्क यांनी ट्विटर सबस्क्रिप्शन सेवा नवीन अटी व शर्तींसह पुन्हा सुरू केली आहे. या नवीन नियमांनुसार, जेव्हा जेव्हा ट्विटर यूजर्स त्याचे प्रोफाइल चित्र, प्रोफाईल नाव किंवा यूजर्सकर्त्याचे नाव बदलेल तेव्हा ब्लू टिक काढून टाकले जाणार आहे. यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करावे लागणार आहे.. आता लॉन्च केलेल्या नवीन ब्लू टिक सबस्क्रिप्शन अंतर्गत कोणत्याही यूजर्सला ब्लू टिक दिली जाईल.

सबस्क्रिप्शनसाठी मिळणार या सुविधा

आजपासून जेव्हा तुम्ही तुमच्या ट्विटर अकाऊंटचे ब्लू टिक सबस्क्रिप्शन घ्याल तेव्हा, ट्विट एडिट करणे (Edit Tweet) , 1080p व्हिडिओ अपलोड करणे (video uploads), रीडर मोड आणि ब्ल्यू टिक ( blue checkmark) या सेवा तुम्हाला मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ट्विटर मायक्रोब्लॉगिंग ब्ल्यू टिक सबस्क्रीप्शन घेणाऱ्यांना घोटाळा, स्पॅम बोट्स यांसारख्या घटनांपासून वाचण्यासाठी प्राधान्याक्रम दिले जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. ब्ल्यू सबस्क्रिप्शनसाठी तुमचे ट्विटर अकाऊंट हे ९० दिवस जुने असणे आणि व्हेरिफाईड फोन नंबर असणे आवश्यक आहे. तसेच ब्ल्यू सबस्क्रिप्शन असलेल्या अकाउंटवरील जाहिरातींची संख्याही कमी असेल असे मस्क यांनी स्पष्ट केले आहे.

ब्ल्यूसह, गोल्ड, ग्रे रंगात ट्विटरचे व्हेरिफाईड अकाऊंट्स लॉन्च

ट्विटरने अखेर त्याचा अकाउंट व्हेरिफिकेशन प्रोग्राम अखेर लॉन्च केला आहे. पूर्वी ट्विटरचे सर्वच व्हेरिफाईड अकाऊंट हे ब्ल्यू टिकमध्ये होते. पण आता यामध्ये ब्ल्यूसह, गोल्ड आणि ग्रे रंगाचे टिक तुम्हाला ट्विटरवर दिसणार आहेत. तीन प्रकराच्या रंगात ट्विटरच्या व्हेरिफाईड अकाउंट्ससाठी टिक जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये ट्विटरने बिझनेस व्हेरिफिकेशन ब्रँड्ससाठी गोल्ड टिक, राजकीय किंवा सरकारी संस्थांसाठी ग्रे टिक तर ब्ल्यू टिक हे सर्वसामान्य किंवा सेलिब्रेटी व्यक्तींसाठी कंपनीने उपलब्ध करून दिले आहे.

Back to top button