Afghan Girl : "अफगाण मुलींना लवकरच शाळेत जाता येणार" - पुढारी

Afghan Girl : "अफगाण मुलींना लवकरच शाळेत जाता येणार"

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानमध्ये तालिबान यांच्याकडून सत्ता मिळविल्यानंतर अफगाण मुलींच्या (Afghan Girl) शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. महिलांच्या अधिकाऱ्यांचा आणि सुरक्षा या मुद्द्यांना घेऊन सर्वांत जास्त चिंता सतावत होती. याच दरम्यान तालिबानने महत्वाची घोषणा केली आहे की, मुलींना शाळेत पाठविण्याची परवानगी दिली जाणार आहे.

तालिबानने मंगळवारी मंत्रीमंडळातील महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर सांगितले की, “अफगाणिस्तानमध्ये मुलींना (Afghan Girl) लवकरच शाळेत जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.” तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितलं की, “आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांना अंतिम स्वरूप देत आहोत. त्यानुसार नवे निर्णय लवकरात लवकर घेतले जाणार आहेत.”

अफगाणिस्तानमध्ये शिक्षणमंत्र्यांनी बारावीपर्यंत शाळांना उघडण्याची मुभा दिल्यानंतर तालिबानने हा निर्णय घेतला. शिक्षण मंत्रालयाने सांगितलं की, “फक्त मुले आणि शिक्षकच शाळेत येऊ शकतात”, असा निर्णय घेतला. पण, या निर्णयामध्ये शिक्षिका आणि विद्यार्थीनींचा उल्लेख केलेला नव्हता.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील पांडवकालीन सातेरी महादेव मंदीर

Back to top button