प्रवाशांची काळजी; छोट्या कारमध्ये हव्यात सहा एअरबॅग | पुढारी

प्रवाशांची काळजी; छोट्या कारमध्ये हव्यात सहा एअरबॅग

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या कारमध्ये प्रवाशांना सहा एअरबॅग ची सुरक्षा मिळायला हवी, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. छोट्या कारमध्ये सहा एअरबॅग्ज असायला हव्यात, असेही ते म्हणाले.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी वाहननिर्मिती कंपन्या छोट्या कारमध्ये दोन एअरबॅग देतात त्याबाबत प्रश्न विचारला असता गडकरी यांनी मत व्यक्त केले.

केवळ मोठ्या आणि लक्झरी कारमध्येच आठ एअरबॅग आणि छोट्या कारमध्ये एअरबॅग  ची संख्या तीन हा भेद चुकीचा आहे.

प्रामुख्याने अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील ग्राहकांकडून छोट्या कार घेतात. त्यांच्या सुरक्षेची हमी कंपन्यांनी घ्यायला हवी.

कंपन्यांनी छोट्या कारमध्ये किमान सहा एअरबॅग देण्याबाबत विचार करायला हवा.

छोट्या कारची खरेदी कायम अल्प उत्पन्न गट किंवा मध्यम उत्पन्न गटातील लोक करत असतात.

त्यांच्या कारमध्ये दोन किंवा तीन एअरबॅग असतात.

या कारमध्ये अवघ्या दोन किंवा तीनच एअरबॅग असतात. अपघात झाल्यास ते प्रवाशांच्या जीवावर बेतणारे ठरू शकते.

त्यामुळे सरसकट छोट्या कारमध्ये एअरबॅग कारमध्ये  एअरबॅगची संख्या सहा असावी.

किंमती वाढणार

छोट्या कारमध्ये सहा एअरबॅग दिल्यास त्यांच्या किमतीत किमान तीन हजार रुपये ते चार हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

किंमत वाढली तरी, चालेल पण अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

एप्रिलपासून दोन एअरबॅग अनिवार्य

एक एप्रिल २०२१पासून सर्व प्रकारच्या कारमध्ये किमान दोन एअरबॅग बंधनकारक करण्यात आल्या आहेत. प्रवासीसुरक्षेबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हा बदल करण्यात आला.

हेही वाचा

Back to top button