Omicron BF.7: अमेरिकेसह १० देशांत कोरोनाचा उद्रेक; ‘ओमायक्रॉन’च्या बीएफ.7 सबव्हेरियंटचा चीनमध्ये उच्छाद

Omicron BF.7
Omicron BF.7
Published on
Updated on

लंडन / बीजिंग : : वृत्तसंस्था:चीनमध्ये 'ओमायक्रॉन'च्या बीएफ ७  (Omicron BF.7) या सबव्हेरियंटने धुमाकूळ घातला असून, त्याची लागण झालेल्या एका रुग्णामुळे अन्य सरासरी १८ जणांना लागण होत असल्याने त्याचा संक्रमण वेग प्रचंड आणि भयभीत करणारा आहे. त्यामुळेच येत्या काही महिन्यांतच कोरोना रुग्णसंख्या ८० कोटींपर्यंत जाईल आणि या देशातील मृतांचा आकडाही २१ लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज लंडनमधील 'एअरफिनिटी' या ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स कंपनीने वर्तविला आहे.

जनआंदोलनाच्या रेट्यापुढे चीनमध्ये शून्य कोरोना धोरण सैल करण्यात आले आहे. चीनमध्ये अत्यल्प लसीकरण झालेले आहे. जे काही लसीकरण झालेले आहे, त्याचाही चिनी लसीच्या अल्पपरिणामकारकतेमुळे फारसा उपयोग झालेला नाही. चिनी लोकांमध्ये कोरोनाशी लढू शकतील, अशा अँटिबॉडीज्चा अभाव आहे. त्यामुळे हा धोका अधिक आहे, असेही 'एअरफिनिटी'ने म्हटले आहे.चीनच्या रुग्णालयांतील सर्व खाटा तुडुंब भरल्या आहेत. उपचारासाठी रुग्ण डॉक्टरांसमोर गयावया करत आहेत. बीजिंगच्या स्मशानभूमींतून २४ तास अंत्यसंस्कार सुरू आहेत. चीनमध्ये 'ओमायक्रॉन'चा नवा सबव्हेरियंट बीए. ५.२.१.७ धुमाकूळ घालत आहे. या सबव्हेरियंटला शास्त्रज्ञांनी बीएफ.७ असे नाव दिले आहे. तज्ज्ञांच्या मते, हा सबव्हेरियंट 'ओमायक्रॉन'चे सर्वात धोकादायक म्युटेशन आहे.
जपानमध्ये दिवसात ७२ हजार नवे रुग्ण

Omicron BF.7: जपानमध्ये दिवसात ७२ हजार नवे रुग्ण 

वॉशिंग्टन / टोकियो : वृत्तसंस्था
अमेरिकेसह जगातील दहावर देशांत कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत १९ हजार ८९३ नवे रुग्ण आढळले आहेत आणि ११७ लोकांचा मृत्यू या कालावधीत झाला आहे.जर्मनीमध्ये सर्वाधिक ५५ हजार रुग्ण आढळले आहेत आणि १६१ जण मरण पावले आहेत. जपानमध्ये सर्वाधिक ७२ हजार २९७ नवे रुग्ण आढळले आहेत. १८० जण मरण पावले आहेत. ब्राझीलमध्ये २९ हजार ५७९ नवे रुग्ण समोर आले असून, १४० जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियामध्ये २६ हजार ६२२ नवे रुग्ण आढळले असून, ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये ८ हजार २१३ रुग्ण आढळले आहेत आणि १७८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना, भारतात सक्रिय रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी ८ पर्यंत देशात ३ हजार ४९० सक्रिय रुग्ण होते, मार्च २०२० नंतरची ही किमान संख्या आहे. मंगळव- भारी मात्र दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात आली. मंगळवारी दिवसभरात १३१ कोरोनाबाधितांची भर पडली; तर दोन रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक कोरोना मृत्यूची नोंद घेण्यात आली. बुधवारी देशाचा कोरोनामुक्ती दर ९८.८० टक्के आणि कोरोना मृत्यू दर १.१९ टक्क्यावर स्थिर नोंदवण्यात आला. मंगळवारी सक्रिय रुग्णसंख्येत मात्र आणखी घट झाली. आता ३ हजार ४०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news