बीजिंग, पुढारी ऑनलाईन डेस्क : अॅमेझॉन, गुगल, फेसबुक अशा किती तरी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. कर्मचारी कपातीचे लोण आता चीनमध्येही पोहोचले आहे. येथील सर्वांत मोठी मोबाईल कंपनी शाओमीने ५२५० कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाओमी कंपनीत एकूण ३५ हजार कर्मचारी आहेत. यातील १५ टक्के कर्मचारी कमी केले जाणार आहेत. शाओमीने काही काही महिन्यांपूर्वीच नोकर भरती केली होती. आताच्या नोकर कपातीत नव्याने भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.
शाओमी कंपनीला या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत ९.७ टक्के इतका तोटा झाला आहे. त्यामुळे कंपनीने कर्मचारी कपातीचे धोरण स्वीकारले आहे. कंपनीच्या एकूम महसुलामध्ये स्मार्टफोनचा वाटा ६० टक्के इतका आहे. पण याच व्यवसायात कंपनीला वार्षिक ११ टक्के इतके नुकसान सोसावे लागले आहे. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांनी विविध सोशल मीडियावर यासंदर्भात लिहिले आहे.
शाओमीला सध्या ओपो, व्हिओ आणि वनप्लस अशा कंपन्यांची मोठी स्पर्धा आहे. भारतात स्मार्टफोनमध्ये शाओमी आघाडीवर असली तरी सॅमसंग, व्हिओ, रिअलमी आणि ओपो या कंपन्यांनी मोठे आवाहन उभे केले आहे.
हेही वाचा