HP layoffs : HP कंपनी पुढच्या तीन वर्षांत ६ हजार कर्मचार्‍यांची कपात करणार | पुढारी

HP layoffs : HP कंपनी पुढच्या तीन वर्षांत ६ हजार कर्मचार्‍यांची कपात करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क: HP ही कॉम्प्युटर, लॅपटॉप सारख्या तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तू बनविणारी जगभरातील सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या टेक कंपन्यांमध्ये कर्माचारी कपात केली जात आहे. ट्विटर ते अॅमेझॉन या सर्वच कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. या रांगेत आता एचपी (HP layoffs ) कंपनी देखील आहे. एचपी या कॉम्प्युटर कंपनीने पुढच्या तीन वर्षात ४ ते ६ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ‘मनी कंट्रोल’ ने या संबंधीचे वृत्त दिले आहे.

HP या कंपनीने याविषयी अधिक माहिती देताना सांगितले आहे की, HP ही कॉम्प्युटर क्षेत्रातील (HP layoffs ) सर्वात मोठी कंपनी आहे. ही जगभरातील कॉम्प्युटर बनविणाऱ्या कंपन्यांपैकी एक मोठी कंपनी आहे. यापूर्वी अॅमेझॉन, ट्विटर, फेसबुक आणि डिस्ने यांसारख्या नामांकित कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. अमेरिकेवरील येऊ घातलेल्या मंदीच्या संकटामुळे अनेक कंपन्या खर्च कमी करण्यावर भर देत आहेत. कंपनीच्या या घोषणेनंतर मंगळवारी HP कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. कंपनीचे शेअर्स अचानक ०.७५ ने वाढले आणि ते पुन्हा थांबलेले दिसले.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या अडचणीत आहे. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या (HP layoffs ) आपल्या खर्चात कपात करत आहेत. यापूर्वी अॅमेझॉन, ट्विटरसह अनेक अमेरिकन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. यामध्ये फेसबुकची सहयोगी कंपनी Meta, Microsoft, Salesforce या कंपन्यांचा समावेश आहे.

HP ही जगातील सर्वात मोठी संगणक निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. HP च्या कॉम्प्युटर विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पण कोरोनानंतर पुन्हा HP कंपनीच्या कॉम्प्युटर, लॅपटॉप यांसारख्या वस्तुंच्या विक्रीत पुन्हा वाढ झाली. वर्क फ्रॉम होममुळे मोठ्याप्रमाणात लॅपटॉपची मागणी देखील वाढली आहे. कंपनीने मंगळवारी दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, फ्यूचर रेडी ट्रांसफॉर्मेशन प्लाननुसार, पुढच्या तीन वर्षात कंपनी खर्चात १.४ अब्ज डॉलर कपात अपेक्षित आहे. यामध्ये कंपनी पुनर्रचनामुळे १ अब्ज डॉलर इतकी रक्कम नियोजित असल्याचेही कंपनीने सागितले आहे.

हेही वाचा:

Back to top button