अफगाणिस्तानच्या गोळीबारात ६ पाकिस्तानी ठार; दोन देशांतील तणाव वाढला – Afghanistan Pakistan tension | पुढारी

अफगाणिस्तानच्या गोळीबारात ६ पाकिस्तानी ठार; दोन देशांतील तणाव वाढला - Afghanistan Pakistan tension

पाकिस्तानच्या प्रत्युत्तरात तालिबानी ठार

पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानातील तालिबानी सैन्याने केलेल्या गोळीबारात ६ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १७ नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या चमन या भागात हा गोळीबार झाला. पाकिस्तानने दिलेल्या प्रत्युत्तरात एका अफगाणी सैनिकाचा मृत्यू झाला आहे. बीबीसीने ही बातमी दिली आहे. (Afghanistan Pakistan tension)

या हिसेंचे नेमके कारण समजलेले नाही, पण गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानाचा ताबा घेतल्यानंतर दोन्ही देशांत सुरक्षेच्या मुद्द्यावरून तणाव वाढलेला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी घटनेचा निषेध केला आहे. (Afghanistan Pakistan tension)

अफगाणिस्तानचे सैन्य सीमेवर चौकी बांधत होते, त्याला पाकिस्तानने आक्षेप घेतला होता, त्यातून हा गोळीबार झाला, असे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

२०१७पासून पाकिस्तान सीमेवर काटेरी कुंपण उभे करत आहे, त्याला तालिबानचा आक्षेप आहे, त्यातून गोळीबार झाल्याचे वृत्त अन्य एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात एका तालिबानी सैनिकाचा मृत्यू झाल्याचे तर १० जखमी झाल्याचे कंदाहार प्रशासनाने म्हटले आहे. दोन आठवड्यांपूर्वी काबुलमधील पाकिस्तानच्या दूतावासावर गोळीबार झाला होता.

हेही वाचा

Back to top button