Afghanistan : एकट्याने विमान प्रवास करणाऱ्या महिलांना थांबवा; तालिबान्यांचा नवा आदेश  | पुढारी

Afghanistan : एकट्याने विमान प्रवास करणाऱ्या महिलांना थांबवा; तालिबान्यांचा नवा आदेश 

काबूल, पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी महिलांनी एकट्याने विमानात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, “तालिबान्यांनी सर्व एअरलाईन्सना आदेश दिलेले आहेत की, आता महिलांना पुरुष नातेवाईक असेल तर विमानात प्रवेश देण्यास परवानगी द्यावी.”

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबान्यांनी अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत केली. यानंतर महिलांवर जाचक अटी घालण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी पहिल्यांदाच मुलींची शाळा काढण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच महिलांवर नवी बंधनं घालत मुलींच्या शाळा सुरू करण्याची परवानगी नाकारली.

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) एरियाना अफगाण एअरलाईन आणि काम एअरलाईनच्या दोन अधिकाऱ्यांना रविवारी रात्री उशिरा तालिबान्यांनी आदेश दिला. त्यांनी सांगितेल की, आमच्याकडून कोणत्याही महिलेला एकट्याने विमान प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही. दोन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपी या वृत्तसंस्थेला त्यांनी सांगितले की, “दोन एअरलाईन कंपन्यांच्या प्रतिनिधी आणि विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यात गुरूवारी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

अफगाणीस्तानात पुन्हा तालिबान्यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर महिलांच्या स्वातंत्र्यावर खूप निर्बंध लादण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एका अमेरिकी पासपोर्ट असणाऱ्या अफगाण महिलेला शुक्रवारी सकाळी दूबईला जाणाऱ्या विमानात बसण्याची परवानगी नाकारली. संबंधित महिला एकट्याने प्रवास करणार होती. त्यामुळे तिच्या हे निर्बंध लादण्यात आले.

Back to top button