पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांची दरवर्षी डिसेंबरमध्ये भेट होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेणार नाहीत. रशियाने युक्रेनविरोधात अण्विक अस्त्रं वापरण्याची धमकी दिली असल्याने मोदी यांनी पुतिन यांची भेट न घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. (Annual summit with Putin)
भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अतिशय निकटचे आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतरही भारत आणि रशिया यांच्यात कटुता आलेली नाही. तर दुसरीकडे भारत युद्धविरोधात भूमिकाही घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना युद्ध नको, असा थेट सल्लाही दिला होता.
भारत आणि रशियाचे राष्ट्रप्रमुख दरवर्षी डिसेंबरमध्ये भेटतात. सन २००० आणि त्यानंतर कोराना महामारीमुळे २०२०ला फक्त भेट होऊ शकलेली नव्हती.
मनिकंट्रोल या अर्थविषय वेबसाईटने ही बैठक या वर्षी होणार नसल्याची बातमी दिली आहे. रशियाने युक्रेनला अण्विक युद्धाची धमकी दिल्याने ही बैठक होणार नाही, असे या वेबसाईटने म्हटले आहे. रशियन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली आहे.
युक्रेन आणि रशिया युद्धात भारताने रशियाचा जाहीर निषेध केलेला नाही.
संयुक्त राष्ट्रांत रशियाच्या निषेधाच्या ठरावात भारताने भाग घेतला नव्हता. पण उझबेकिस्तान येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना युद्ध थांबवून चर्चेचा माग स्वीकारण्याचे आवाहन केले.
हेही वाचा