न्यूयॉर्क/वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : Russia Ukrain War : युइराणकडून रशियाला युक्रेनवरील हल्ल्यांसाठी मानवरहित सशस्त्र ड्रोन पुरविण्यात येत आहेत. क्रीमियामध्ये खुद्द इराणी सैनिक रशियन सैनिकांना सशस्त्र ड्रोनच्या वापराचे प्रशिक्षण देत आहेत, असा आरोप अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने केला असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत हा विषय उचलून धरला आहे.
Russia Ukrain War : इराणने सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे उल्लंघन केल्याचे अमेरिका व मित्र राष्ट्रांनी म्हटले आहे.'व्हाईट हाऊस'कडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात इराणी सैनिक क्रीमियात असून, त्यांच्या येथील आगमनानंतर युक्रेनमधील रशियाचे हल्ले वाढलेले आहेत. इराणकडून कामीकाजे ड्रोन रशियासाठी पाठविण्यात आले आहेत. याच ड्रोनच्या मदतीने 17 ऑक्टोबर रोजी कीव्हवर मोठे हल्ले झाले होते.
Russia Ukrain War : इराणच्या 'शाहीद-136' नावाच्या कामीकाजे ड्रोन हल्ल्यात कीव्हमध्ये 3 जण मरण पावले होते. हे ड्रोन सुसाईड (आत्मघातकी) ड्रोन म्हणूनही ओळखले जाते. 200 किलो वजनाच्या या ड्रोनची मारक क्षमता 2500 कि.मी. आहे. क्रीमियातील इराणी सैनिकांची हजेरी हा या देशाचा युक्रेन युद्धातील सहभाग सिद्ध करणारा सर्वांत मोठा पुरावा आहे, असे पेंटागॉन (अमेरिक संरक्षण विभाग) प्रवक्ता जॉन कर्बी यांनी सांगितले. क्रीमिया या युक्रेनच्या एका प्रांतावर रशियाने 2014 मध्येच ताबा मिळविला होता.
हे ही वाचा: