G20 Summit : ‘हा युद्धाचा नाही…’; पीएम नरेंद्र मोदी यांचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना सल्ला | पुढारी

G20 Summit : 'हा युद्धाचा नाही...'; पीएम नरेंद्र मोदी यांचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना सल्ला

पुढारी ऑनलाईन : सध्या बाली, इंडोनेशिया येथे G20 देशांची शिखर परिषद सुरू आहे. मंगळावारपासून सुरू झालेल्या परिषदेत सदस्य देशाचे प्रमुख उपस्थित आहेत. दरम्यान एक क्षेपणास्त्र पोलंडच्या हद्दीत पडले आणि दोन नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला. परिषदेदरम्यान बोलविण्यात आलेल्या आपत्कालीन बैठकित त्यांना या बैठकिला संबोधित करताना ‘हा युद्धाचा काळ नाही,  युक्रेन युद्ध रोखण्‍यासाठी सर्वांनी मिळून मार्ग काढला पाहिजे. पुतीन यांनी देखील आता हे युद्ध थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा; असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे.

मंगळवारी सुरू झालेल्या वार्षिक दोन दिवसीय G20 शिखर परिषदेच्या दुसर्‍या दिवशी पोलंडमधील क्षेपणास्त्रामुळे दोन लोक ठार झाल्यामुळे राजकीय तणाव वाढला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशिया-युक्रेन तणावाच्या संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी जागतिक नेत्यांसोबत ‘आपत्कालीन बैठक’ बोलावली होती. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते.

भारताचे पंतप्रधान मोदी यांनी हे “युद्धाचे युग नाही” हा दिलेला संदेश सर्व G20 शिष्टमंडळांमध्ये खूप खोलवर गेला. अनेक देशांमध्ये असलेली दरी भरून काढण्यास मदत झाली, असे भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button