पुढारी ऑनलाईन डेस्क : 'स्पिरिट ऑफ युक्रेन' समजले जाणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांची 'टाईम' मासिकाने 'पर्सन ऑफ द इयर 2022' म्हणून निवड केली आहे. टाइम मासिकाने ताज्या अंकात झेलेन्स्की यांना कव्हर पेजवर स्थान दिले आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात झेलेन्स्की गेल्या 10 महिन्यांपासून आपला देश आणि देशवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
टाईम मासिकाने बुधवारी याबाबतची घोषणा केली. गेल्या वर्षभरात जागतिक घडामोडींवर सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. टाइम एडिटर-इन-चीफ एडवर्ड फेलसेन्थल यांच्या म्हणण्यानुसार, "युक्रेनसाठीचा लढा अनेकांना घाबरवू शकतो किंवा अनेकांच्या जीवनात नवी उमेद निर्माण करु शकतो, व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी जगाला अशा प्रकारे प्रेरित केले आहे की जे आपण अनेक दशकांमध्ये पाहिले नाही."
या पदासाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाची निवड करण्याचे हे सर्वात मोठे आणि स्पष्ट कारण असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 9-10 महिन्यांपासून, ते अशा लढाईचे नेतृत्व करत आहे जिथे त्यांचा विरोधक त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. तरीही झेलेन्स्कीने आपल्या सैन्याचे मनोबल उंचावत आहेत. 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) जे काही बोलले ते केवळ युक्रेनियन लोकांसाठीच नाही तर संपूर्ण जगातील लोकांसाठी आणि सरकारांसाठी प्रेरणादायी आहे.
झेलेन्स्की आंतरराष्ट्रीय मंचांवर आपल्या देशाची बाजू मजबूत मांडतात, असे टाईम मासिकाच्या वतीने सांगण्यात आले आहे. झेलेन्स्की यांनी अलीकडेच बाली येथे G-20 शिखर परिषदेला संबोधित केले होते. याशिवाय दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि माद्रिदमध्ये नाटो देशांच्या परिषदेतही त्यांनी जगाला मार्गदर्शन केले आहे. झेलेन्स्की यांना 2022 या वर्षासाठी "द स्पिरिट ऑफ युक्रेन" सह संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
अधिक वाचा :