Nagpur Rain : पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यावर पावसाचे सावट | पुढारी

Nagpur Rain : पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यावर पावसाचे सावट

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गेले काही दिवस नागपुरात ढगाळ वातावरण असल्याने कमालीचा गारठा वाढला आहे. येत्या काही दिवसात नागपुरात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दि. १० ते १२ डिसेंबर या कालावधीत हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या वरुण धारा बरसतील असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला आहे.

विशेष म्हणजे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतिक्षित नागपूर दौरा असून समृद्धी महामार्गाचे उद्घाटन, मेट्रोच्या दोन नव्या सेवांचे लोकार्पण, एम्सचे लोकार्पण, वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा अशा विविध महत्त्वकांक्षी उपक्रमांच्या माध्यमातून नागपूरची विकासाची गाडी अधिक गतिमान होणार आहे.

पंतप्रधानांच्या सभेसाठी आता पूर्वीच्या स्थानात बदल करण्यात आला असून एम्स परिसरात भव्य जाहीर सभेची तयारी सुरू केली आहे. मनपा निवडणुकीपूर्वी विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ असल्याने भाजपने या सभेसाठी किमान पन्नास ते साठ हजारांवर अशी मोठी गर्दी जमवण्याचे उद्दिष्ट प्रभाग पातळीवर सर्व संबंधितांना दिले आहेत. वाहनांच्या पार्किंगसाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर पावसाच्या शक्यतेने अनेकांची चिंता वाढली आहे.

Back to top button