क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज एफटीएक्सचे सीईओ सॅम बँकमन-फ्रॉइड यांच्या संपत्तीत 24 तासात 14.6 अब्ज डॉलर्सची घट

क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज एफटीएक्सचे सीईओ सॅम बँकमन-फ्रॉइड यांच्या संपत्तीत 24 तासात 14.6 अब्ज डॉलर्सची घट

वॉशिंग्टन : या जगात शाश्वत असे काही नाही. कधी रंकाचा राव व रावाचा रंक होईल हेही सांगता येत नाही. अब्जाधीशांच्या संपत्तीतही अनेक वेळा चढ-उतार होत असतात. क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज एफटीएक्सचे सीईओ सॅम बँकमन-फ्रॉइड यांच्या संपत्तीत फक्त 24 तासांत तब्बल 14.6 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

अमेरिकेतील अब्जाधीशांपैकी एक असलेल्या फ्रॉईडच्या संपत्तीत सुमारे 94 टक्क्यांनी मोठी घसरण झाली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, एका दिवसात कोणत्याही अब्जाधीशांच्या संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. सॅम बँक्समन-फ्रॉइड यांची संपत्ती कमी होऊन 991.5 दशलक्ष डॉलर्स इतकी राहिली आहे. तर ते 15.2 अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीचे मालक होते. त्यांचे वय 30 वर्षे आहे. सध्या त्यांची अवस्था ही एका गरीब माणसासारखी झाली आहे.

एक चूक त्यांच्या आयुष्यात इतका मोठा भूकंप आणेल, याबाबत त्यांना कल्पना नव्हती. सॅमची निव्वळ संपत्ती क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज 'एफटीएक्स' मुळे होती आणि त्याने जाहीर केले की 'एफटीएक्स' विकले जात आहे आणि ते प्रतिस्पर्धी 'बायनान्स' द्वारे विकत घेतले जात आहे. त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. यानंतर, जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म 'बायनान्स'चे प्रमुख चांगपेंग झाओ यांनी देखील याची पुष्टी केली.

त्यांनी सांगितले की 'एफटीएक्स'खरेदी करण्याचा करार झाला आहे आणि त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. 'एफटीएक्स'चे छोटे एक्स्चेंज म्हणून वर्णन करताना झाओ म्हणाले की, हे एक्स्चेंज रोखीच्या संकटातून जात आहे. सोशल मीडियामध्ये 'एसबीएफ' म्हणून ओळखल्या जाणार्‍या सॅम बँकमन फ्रायडने मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले आहे आणि त्यांचे वडील स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी वॉ स्ट्रीटमध्ये ब्रोकर म्हणून काम केले. परंतु, त्यानंतर सॅमने 2017 मध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये स्विच केले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news