Nasal Cavity Cancer : डॉक्टरांची कमाल, हातावर नाक उगवून केले ट्रान्सप्लान्ट | पुढारी

Nasal Cavity Cancer : डॉक्टरांची कमाल, हातावर नाक उगवून केले ट्रान्सप्लान्ट

पुढारी ऑनलाइन डेस्क : Nasal Cavity Cancer : आरोग्य संशोधन क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवीन संशोधनामुळे क्रांती होत आहे. त्यामुळे नवनीन प्रकारच्या शस्त्रक्रिया करणे खूप सोपे झाले आहे. सुश्रूतांकडून सुरू झालेला नाकावरील शस्त्रक्रियेच्या तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. फ्रान्समध्ये एक महिलेला झालेल्या नाकाच्या कँसरमुळे तिचे नाक गमावले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्या हातावर नाक तयार करून नंतर ते तिच्या नाकाच्या जागी ट्रान्सप्लान्ट केले.

Nasal Cavity Cancer : एनडीटीव्हीने या संबंधीचे वृत्त दिले आहे. याचे सविस्त्र वृत्त असे 2013 मध्ये फ्रन्समधील एका महिलेला Nasal Cavity Cancer च्या कारणाने महिलेने आपले नाक गमावले होते. Nasal Cavity Cancer एक भयानक कँसर आहे. या कारणामुळे रुग्णाला अनेक प्रकारच्या सम्सयांचा सामना करावा लागतो. 2013 मध्ये महिलेला हा कँसर झाल्यानंतर तिने रेडियोथेरेपी आणि केमोथेरेपीचे उपचार सुरू केले. या उपचारांमुळे तिचे नाक तिला गमवावे लागले. त्यानंतर तिला श्वास घेण्यात अनेक अडचणी येत होत्या.

Nasal Cavity Cancer : 3 डी प्रिंटिगच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने डॉक्टरांनी या महिलेच्या हातावर पेशींचा वापर करून नाक उगवले. त्यानंतर हे नाक ट्रांसप्लांटच्या मदतीने महिलेच्या चेह-यावर पुन्हा बसवण्यात आले आहे. इव्हिनिंग स्टँडर्डच्या अहवालाने याची माहिती दिली आहे. 10 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर महिला सध्या पूर्णपणे स्वस्थ आहे.

हे ही वाचा :

केळीची लागवड फायद्याची

T20 World Cup : विराट कोहली, सूर्यकुमार मालिकावीरच्या शर्यतीत

Back to top button