ट्विटरची ८ डॉलर ‘ब्लू टिक’ व्हेरिफिकेशन सेवा भारतात कधी सुरू होणार? एलॉन मस्क यांनी दिले उत्तर | पुढारी

ट्विटरची ८ डॉलर 'ब्लू टिक' व्हेरिफिकेशन सेवा भारतात कधी सुरू होणार? एलॉन मस्क यांनी दिले उत्तर

पुढारी ऑनलाइन डेस्क : ट्विटरवर ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. भारतात ८ डॉलर ब्लू टिक व्हेरिफिकेशन सेवा कधी सुरू होणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत एका यूजर्सने थेट एलॉन मस्क यांना विचारले. भारतात ‘ट्विटर ब्लू रोल आउटची’ अपेक्षा कधी करता येईल? असा प्रश्न त्याने मस्क यांना विचारला आहे. यावर मस्क यांनी ट्विट करत एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत ‘रोल आउट’ केले जाणार असल्याचे सांगितले आहे.

ट्विटरचा ताबा घेताच एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठे बदल घडवून आणण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘ब्लू टिक’ करीता ८ डॉलर प्रति महिना शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. सध्या ट्विटर ‘ब्लू टिक’ शुल्कची ५ देशांसाठी घोषणा केली आहे. यामध्ये युएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड आणि युके यांचा समावेश आहे. यानंतर ट्विटरच्या या सेवेचा दुसऱ्या देशांमध्ये रोल आउट करण्यात येणार आहे. भारतातून ट्विटर ‘ब्लू रोल आउट’ कधी होणार, असा सवाल एका युजर्सने मस्क यांना केला. या प्रश्नाला उत्तर देताना मस्क यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधीत रोल आउट केले जाणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान ‘ब्लू टिक’ व्हेरिफिकेशनच्या ८ डॉलर प्रति महिना प्लानची सुरूवात आजपासून करण्यात येत आहे. सुरूवातीला अॅपल युजर्सना सुरू केले जात आहे.

Twitter Blue काय आहे?

ट्विटर हे सार्वजनिक मेसेज अॅप आहे. यातून मोजक्या शब्दात तुमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा अशी सुरुवातीची ट्विटरची संकल्पना होती. नंतर त्यामध्ये फोटो, व्हिडिओ यांच्यासारखे आणखी नवीन फिचर त्यांनी अद्ययावत केले. तसेच तुमची विशिष्ट ओळख जपण्यासाठी  ट्विटरचे सशुल्क सदस्यत्वाची योजना आखण्यात आली. त्याअंतर्गत तुम्ही सत्यापित वापरकर्ते आहात हे सत्यापन केलेल्यांसाठी ‘ब्ल्यू टिक’ असे चिन्ह देण्यात येते. यासाठी ‘ट्विटर ब्ल्यू’ ही सेवा सुरू करण्यात आली. ज्यांनी ही सेवा घेतली आहे. त्यांचे खाते सत्यापित करण्यासाठी हे शुल्क लागू करण्यात आले. त्यानंतर अकाउंट व्हेरिफाय करण्यात येऊन त्यांच्या खात्यावर ‘ब्ल्यू मार्क’ येत असतो. सोबतच ट्विटर जे नवीन फिचर्स घेऊन येते ते या सदस्यांना वापरता येते. जसे की पोस्ट केलेले ट्विट एडिट करणे, अन डू करणे इत्यादी…

हेही वाचा :

Back to top button