Elon Musk: एलॉन मस्क यांची मोठी घोषणा ट्विटरवर आता कॉमेडी होणार कायदेशीर | पुढारी

Elon Musk: एलॉन मस्क यांची मोठी घोषणा ट्विटरवर आता कॉमेडी होणार कायदेशीर

पुढारी ऑनलाईन: टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर 44 बिलियन डॉलरमध्ये विकत घेतले. ट्विटर हातात येताच मस्क अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. ट्विटरची मालकी येताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल आणि कायदेशीर धोरण प्रमुख विजया गड्डे या दोघांमुळे भारतीयांसह सीएफओ नेड सेगल, जनरल काउंसल आणि सीन एडगेट यांना काढून टाकले. यानंतर ट्विटरवर आता कॉमेडीही कायदेशीर असल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे.

यानंतर एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया ट्विटरवरील कंटेन्ट संदर्भात कंपनी कंटेंट मॉडरेशन कौन्सिल तयार करण्यात येणार असून, ती ट्विटर प्लॅटफॉर्मवर कंटेंट मॉडरेशनशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ शकेल. मात्र अद्याप कंटेंट संदर्भात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचेही एलन मस्क यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे.

ट्विटरचा व्यवहार पूर्ण केल्यानंतर एलन मस्क 27 ऑक्टोबरला ट्विटर ऑफिसमध्ये फिरताना व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी आपले ट्विटर प्रोफाइल देखिल बदलले आहे. त्यांनी प्रोफाइलमध्ये ट्विटर मुख्यालय असे केले आहे. त्यानंतर आज पक्षी मुक्त झाला असे ट्विट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button