DOVE ड्राय शॅम्पूत आढळला कॅन्सरघटक; युनिलिव्हरने बाजारातून परत मागवली उत्पादने | पुढारी

DOVE ड्राय शॅम्पूत आढळला कॅन्सरघटक; युनिलिव्हरने बाजारातून परत मागवली उत्पादने

पुढारी ऑनलाईन: हिंदुस्थान युनिलिव्हरच्या डव्ह शॅम्पूमध्ये बेंझिन हे घातक रसायन सापडले आहे. शॅम्पूमधील या घटकामुळे कॅन्सर होण्याचा धोका हा सर्वाधिक वाढतो. त्यामुळे युनिलिव्हरने अमेरिकी बाजारातून डव्ह हे एरोसोल ड्राय शॅम्पू परत मागवले आहेत. यापूर्वी जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकी कंपनीलाही अशाप्रकराचा फटका बसला होता.

हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीची उत्पादने जगभर मोठ्या प्रमाणात वापरली जातात. कंपनीने परत मागवलेल्या वस्तूंमध्ये Dove शॅम्पूसोबत Nexxus, Suave, Tresemmé and Rockaholic and Bed Head dry shampoo maker Tigi, यांसारख्याही गृहउपयोगी वस्तूंचाही यामध्ये समावेश असल्याचे ब्लूमबर्गने अन्न आणि औषध प्रशासनाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या नोटिसचा हवाला देत वृत्त दिले आहे.

बेंझिन हे मानवी शरिरासाठी घातक ठरणारा घटक आहे. बेंझिन हा घटक मानवी शरिरात नाक, तोंड आणि त्वचेच्या माध्यमातून शरिरात प्रवेश करतात. त्यामुळे Dove या जगप्रसिद्ध शॅम्पूमध्ये बेंझिनसारखा कर्करोगाला आमंत्रण देणारा घटक असल्याकारणाने युनिलिव्हरने Dove शाम्पूबरोबरच अनेक उत्पादने अमेरिकेतील बाजारातून मागे घेतली आहेत.

हेही वाचा:

Back to top button