Congress president : मल्लिकार्जुन खर्गे आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) बुधवारी (दि. २६) दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात या पदाचा कार्यभार (Congress president) स्वीकारतील. सर्व काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, खासदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सीएलपी नेते, माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आणि एआयसीसीच्या इतर पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. वरील सर्व संबंधितांना कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी निमंत्रण पाठवले आहे.
आज सकाळी (दि.२६) मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजघाटावर जावून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
Congress president : २४ वर्षानंतर गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष
खर्गे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शशी थरूर (Shashi Tharoor) यांना पक्षाच्या सर्वोच्च पदाच्या शर्यतीत मोठ्या फरकाने पराभूत केले. २४ वर्षांनंतर कॉंग्रेसचे अध्यक्षपद मिळवणारे ते पहिले गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती आहेत. १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात खर्गे यांना राष्ट्रपतीपदाच्या लढतीत ७,८९७ मते मिळाली तर त्यांचे विरोधक शशी थरूर यांना १,०७२ मते मिळाली. काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे.
हेही वाचा?
- Smriti Mandhana New Car : दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर स्मृती मानधनाने खरेदी केली नवी रेंज रोव्हर कार
- Rishi Sunak-Ashish Nehra : आशिष नेहरा झाला ब्रिटनचा पंतप्रधान! नेटक-यांकडून मिम्स व्हायरल
- आमदार अमरीश भाई पटेल : अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून शिरपूरचे देशभरात नावलौकिक
- Diwali special story : बेळगाव- महाराष्ट्रात गेल्यानंतरच दिवाळीची आरती; जळगेवासियांचा ६६ वर्षानंतरही निर्धार कायम
- ऋषी सुनक आणि अक्षता : बेशिस्त बायको आणि शिस्तप्रिय नवरा – Who is Rishi Sunak and his wife Akshata?

