

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोकरी निमित्त गेलेले जवळपास १०० तरुण अबुधाबी येथे अडकले असल्याची घटना समोर आली आहे. हे सर्व तरुण पंजाब येथील असल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्यांची एका खासगी कंपनीने फसवणूक करून कामावरून काढून टाकण्यात आले आहे. पंजाब मधील सामाजिक कार्यकर्ते दिलबाग सिंह यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहून ही माहिती दिली. तसेच या पत्रामध्ये या सर्व तरुणांच्या बचावासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात यासंबंधीची मागणी करण्यात आले आहे. (Punjab Youths Trapped)
बैनापूर गावातील रहिवासी दिलबाग यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले. यामध्ये ते म्हणतात की, स्क्वॉयर जनरल कॉन्ट्रॅक्ट कंपनीने अबुधाबी येथील युवकांचा पासपोर्ट जप्त केलेला आहे. पासपोर्ट न मिळाल्याने सर्वजण तिथेच अडकले असल्याचे सांगितले जात आहे. (Punjab Youths Trapped)
सिंह यांनी या 'हेल्प डेस्क' साईटद्वारे युवकांना मदत मिळावी, अशी मागणी केंद्र सरकार कडे केलेली आहे. त्यांनी दिलेल्या पत्राची एक प्रत पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली आहे. दिलबाग सिंह यांनी याद्वारे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांना या प्रकरणी मदत करण्याची विनंती देखील केले आहे. पंजाबी तरुणांच्या कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिल्याचे दिलबागने सांगितले. त्यानंतर त्यांनी ही बाब केंद्र आणि पंजाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे.
हेही वाचा