पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतावर १५० वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या आणि भारताला गुलामीत लोटणाऱ्या इंग्रजांच्या अर्थात साहेबांच्या देशाचा कारभारी होण्याची किमया ऋषी सुनक यांनी करुन दाखवली आहे. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे असून ते ब्रिटनेचे पहिले हिंदू पंतप्रधान ठरले आहेत. हिंदू कुंटुबातून येणाऱ्या आणि अभिमानाने हिंदू संस्कृती, परंपराचे यांचे आचरण करणारे ऋषी सुनक पंतप्रधान बनल्याने तमाम भारतीयांना आणि हिंदू बांधवांना दिवाळीची अनोखी भेट मिळाली आहे. चला जाणून घेऊया ब्रिटनच्या पहिले हिंदू पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या बद्दलच्या पाच गोष्टी. (Rishi Sunak UK PM)
ऋषी सुनक यांनी जागतिक इतिहास रचला आहे. एक भारतीय व्यक्ती आणि त्यात ही एक हिंदू धर्मिय व्यक्ती ब्रिटन सारख्या बलाढ्य देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान होण्याचा मान ऋषी सुनक यांनी मिळवला आहे. ऋषी सुनक यांचे आजोबा मुळचे पंजाबचे त्यांचे नाव दादा रामदास. ते सुनक गुंजरावाल या गावा रहात होते. फाळणी नंतर हे गाव पाकिस्तानमध्ये गेले. दादा रामदास यांनी १९३५ साली आपलं गाव सोडलं आणि क्लर्कची नोकरी भारतातून आफ्रिका खंडातील नैरोबी येथे गेले. नैरोबी ही केनिया या देशाची राजधानी आहे. ऋषी सुनक यांचे आत्मचरित्र लिहणारे लेखक मायकल ॲशक्रॉफ्ट यांनी लिहले आहे की, भारतात हिंदू – मुस्लीम यांच्यातील वाढता तणाव आणि बिघडणाऱ्या संबधांमुळे त्यांनी देशसोडून जाण्याचा निर्णय घेतला. रामदास हे अकाऊंन्ट होते आणि त्यांनी केनियामध्ये ते प्रशासन अधिकारी बनले. रामदास आणि त्यांची पत्नी सुहागराणी यांना तीन मुले व तीन मुली अशी एकूण सहा आपत्य होती. ज्यातील ऋषी सुनक यांचे वडील यशवीर यांचा जन्म हा केनियामध्ये १९४९ साली झाला. १९६६ साली यशवीर हे इग्लंडमधील लीव्हरपूलला आले आणि येथील विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली. सध्या ते साऊथ हॅम्पटनमध्ये राहतात. (Rishi Sunak UK PM)
सुनक यांचे शालेय शिक्षण
ऋषी सुनक यांचे शालेय शिक्षण ब्रिटनच्या विंचेस्टर कॉलेजमधून झाले. ही ब्रिटनमधील सर्वात प्रतिष्ठित शाळांपैकी एक आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेतील ऑक्सफर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ गाठले आणि येथून पुढील शिक्षण पूर्ण केले. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी गोल्डमन सॅक्स आणि इतर काही कंपन्यांमध्ये काम केले. (Rishi Sunak UK PM)
सुनक यांना हिंदू असल्याचा अभिमान
ऋषी सुनक हे अत्यंत धार्मिक स्वभावाचे गृहस्थ आहेत. ते स्वत: हिंदू असल्याने आणि हिंदू परंपरा व श्रद्धांचे पालन करण्यावर भर देतात. ते जेव्हा खासदार बनले तेव्हा त्यांनी भगवतगितेची शपथ घेतली होती. ऋषी सुनक नेहमी लोकांमध्ये म्हणतात की मी ब्रिटनचा नागरिक आहे व मला हिंदू असल्याचा अभिमान आहे.
इन्फोसिसचे नारायण मुर्ती यांचे जावई
ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले ऋषी सुनक यांचे मूळ जसे भारतीय आहे तसेच ते भारताचे जावई सुद्धा आहेत. इन्फोसिसचे संस्थापक व प्रसिद्ध उद्योगपती नारायण मुर्ती यांचे ते जावई आहेत. नारायण मुर्ती यांची मुलगी अक्षता मुर्ती या फॅशन डिझायनर आहेत. कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठात एमबीए करत असताना ऋषी सुनक व अक्षता यांची भेट झाली. या भेटीचे पुढे प्रेमात आणि नंतर लग्नात रुपांतर झाले. त्यांनी ऑगस्ट २००९ मध्ये विवाह केला.
सुनक यांनी गोमांस सोडण्याचे केले होते आवाहन
2020 मध्ये ऋषी सुनक यांनी अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली. यादरम्यान त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आणि ते प्रत्येक भारतीयाचे आवडते बनले. एका ब्रिटिश वृत्तपत्राने त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिले.
ऋषी म्हणाले, 'मी आता ब्रिटनचा नागरिक आहे पण माझा धर्म हिंदू आहे. भारत हा माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. मी अभिमानाने सांगू शकतो की मी हिंदू आहे आणि हिंदू असणे ही माझी ओळख आहे. स्वत:च्या टेबलवर गणेशाची मूर्ती ठेवणाऱ्य सुनक यांनी धार्मिक कारणास्तव गोमांस सोडण्याचे आवाहनही केले आहे. तसेच ते स्वतः देखील गोमांस सेवन करत नाहीत.
अधिक वाचा :