ऋषी सुनक आणि अक्षता : बेशिस्त बायको आणि शिस्तप्रिय नवरा - Who is Rishi Sunak and his wife Akshata?
ऋषी सुनक आणि अक्षता : बेशिस्त बायको आणि शिस्तप्रिय नवरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड झाली आहे. या पदावर निवडून येणारे ते पहिले ब्रिटिश भारतीच नव्हे तर पहिले ब्रिटिश आशियायी नागरिक ठरले आहेत. सुनक यांचे आजी-आजोबा हे मुळचे पंजाबचे होत. तसेच ऋषी, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. (Who is Rishi Sunak and his wife Akshata?)
ऋषी सुनक यांचा जन्म १२ मे १९८०ला पूर्व आफ्रिकेत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव यशवीर तर आईचे नाव उषा असे आहे. ऋषी यांचे आजी-आजोब मुळचे पंजाबचे, ते १९६०च्या दशकात पूर्व आफ्रिकेत स्थलांतरित झाले. ऋषी यांचे वडील ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये कार्यरत होते. तर त्यांच्या आई उषा या फार्मसी चालवत.
सुनक यांचे शिक्षण
सुनक यांनी ऑक्सफर्डमधील लिंकन कॉलेजमधून अर्थशास्त्र तर विचेंस्टर कॉलेजमधून तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्राची पदवी घेतली आहे. शिवाय स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी शिष्यवृत्तीवर MBA केले.
२००१ ते २००४ या काळात ते गोल्डमन सॅशमध्ये विश्लेषक म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांनी द चिल्ड्रन इनव्हेसमेंट फंड मॅनेजमेंट, थेलेम पार्टनर अशा काही कंपन्यात काम केले. पॉलिस एक्सचेंज या संस्थेत त्यांनी कृष्णवर्णिय आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. २०१५ला ते रिचमंड येथून खासदार झाले. २०१७ला पुन्हा निवडून आले. २०१९पासून ते वित्तमंत्री म्हणून काम करत होते. ५ जून २०२२ला त्यांनी बोरिस जॉन्सन यांच्यावर अविश्वास व्यक्त करत वित्तमंत्र पदाचा राजीनामा दिला.
ऋषी सुनक आणि अक्षता यांची लव्हस्टोरी
अक्षता आणि ऋषी यांचे लग्न २००९ला बंगळुरूमध्ये झाले. दोन दिवस चालेल्या या लग्नसमारंभात अनिल कुंबळे, राहुल द्रविड उपस्थित होते. स्टॅनफर्ड विद्यापीठात दोघे एकत्र शिकत होते. कॉलेज काळात अक्षताच्या शेजारी बसता यावे यासाठी ऋषी यांनी त्यांचे विषय बदलून घेतले होते. “मला टापटीप आणि शिस्त फार आवडते. तर अक्षताचा स्वभाव पूर्ण वेगळा आहे, ती जास्त उत्स्फूर्त आहे. कपडे कुठेही पडलेले असतात, आणि चपलांचं तर विचारूच नका,” असे ऋषी यांनी संडे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा यांची कन्या अक्षता या फॅशन डिझायनर आहेत. अक्षता डिझाईन्स या नावाने त्यांचे फॅशन लेबल प्रसिद्ध आहे. इन्फोसिसमध्ये अक्षता यांचे ०.९१ टक्के शेअर आहेत. तसेच लंडनमधील Catamaran Venture या गुंतवणूक कंपनीची मालकी त्यांच्याकडे आहे. याशिवाय ब्रिटनमधील ६ कंपन्यामध्ये त्यांची गुंतवणूक आहे.
Britain’s Conservative Party leader #RishiSunak becomes the Prime Minister of the United Kingdom. pic.twitter.com/nC39dzX7gd
— ANI (@ANI) October 24, 2022
हेही वाचा
- Britan PM Celection : असे घडल्यास ऋषि सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात!
- ब्रिटिश पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक यांचे पारडे जड
- Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर, उरले फक्त तीन विरोधक