एलन मस्क यांचे अंबानींना थेट आव्हान : भारतात उपग्रहातून इंटरनेट पुरवण्यासाठी Starlink brand सज्ज | पुढारी

एलन मस्क यांचे अंबानींना थेट आव्हान : भारतात उपग्रहातून इंटरनेट पुरवण्यासाठी Starlink brand सज्ज

पुढारी ऑनलाईन : जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती असलेले एलन मस्क यांची उपग्रहातून पुरवणारी इंटरनेट सेवा भारतात सुरू होणार आहे. ही सेवा पुरवणारी मस्क यांच्या स्टारलिंक या कंपनीने ही सेवा पुरवण्यासाठी आवश्यक लायसन्ससाठी दूरसंचार विभागाकडे अर्ज केला आहे. ( Starlink brand ) त्यामुळे मुकेश अंबानी यांच्या जीओला थेट टक्कर देणारी सेवा भारतात सुरू होईल.

गेल्या आठवड्यात स्टारलिंकने Global Mobile Personal Communication by Satellite (GMPCS) अर्ज केल्याची बातमी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिली आहे. अशा प्रकारच्या सेवेसाठी एअरटेलच्या OneWeb, जिओच्या Jio Space Technology या कंपन्यांनी अर्ज सादर केले आहेत.

 Starlink brand : स्टारलिंककडे सर्वाधिक उपग्रह

भारतात उपग्रहातून इंटरनेट सेवा पुरवण्याचे एकूण मार्केट २०२५पर्यंत १३ अब्ज डॉलरचे असणार आहे. त्यामुळे विविध कंपन्या ही सेवा सुरू कऱण्यासाठी उत्सुक आहेत. स्टारलिंककडे सर्वांत जास्त म्हणजे ३,४५१ इतके उपग्रह आहेत. जगभरात ही सेवा देण्यासाठी कंपनी अजून १२००० उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button