Ayodhya Deepotsav – १५ लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची असणार विशेष उपस्थिती | पुढारी

Ayodhya Deepotsav - १५ लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची असणार विशेष उपस्थिती

Ayodhya Deepotsav - १५ लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या

अयोध्या, पुढारी ऑनलाईन डेस्क – दिवाळी निमित्त शरयू नदीच्या तीरावर होत असलेल्या दीपोत्सवात (Ayodhya Deepotsav) यावेळी तब्बल १५ लाख दिवे लावण्यात येणार आहेत. यातील बहुतांश दिवे हे गाईच्या शेणापासून बनवण्यात येत आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दीपोत्सवासाठी उपस्थितीत राहणार आहेत.

अयोध्या येथे शरयू नदीवर राम की पैडी हा घाट प्रसिद्ध आहे. हा घाट आणि अयोध्येतील इतर मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो. २०२१ला दीपोत्सवात ९, ४१, ५५१ इतके मातीचे दिवे वापरण्यात आले होते. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती. या वर्षी जवळपास १५ लाख दिवे लावण्याचे नियोजन सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात पूजा करतील, त्यानंतर राम कथा पार्कला भेट देतील. याशिवाय रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विकासच्या कामाचा ते आढावा घेतील. याशिवाय शरयू आरतीमध्ये ते सहभागी होतील. अयोध्येत दीपोत्सवाच्या निमित्ताने डिजिटल आतषबाजीचे आयोजन करण्यात आले आहे.

राम मंदिर बांधकाम समितीची आढावा बैठक काही दिवसांपूर्वी झाली. राम मंदिराचे काम ५० टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती या समितीने दिली आहे.

हेही वाचा

Back to top button