Apple ने दिला चीनला झटका, iPhones मध्ये चीनी चिपसेटचा वापर बंद!

Apple ने दिला चीनला झटका, iPhones मध्ये चीनी चिपसेटचा वापर बंद!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ॲपलने चीनला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. Apple ने चीननधील Yangtze Memory Technologies Company (YMTC) च्या मेमरी चिप आपल्‍या उत्पादनांमधील वापर थांबवला आहे. फ्लॅश मेमरी हे स्मार्टफोन आणि संगणकांपासून सर्व्हरपर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील एक मुख्य आहे.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, iPhones मध्ये वापरण्यासाठी YMTC ची 128-लेयर 3D NAND फ्लॅश मेमरी यापूर्वी वापरण्यास बंदी आणली होती. तसेच आता कंपनीने चिपच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

NAND फ्लॅश मेमरीचा सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापर

NAND फ्लॅश मेमरी हे स्मार्टफोन आणि वैयक्तिक संगणकांपासून सर्व्हरपर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक साधणांमध्ये वापरली जाते. YMTC च्या 128-लेयर या चिनी चिप उत्पादकाने बनवलेल्या सर्वात प्रगत चिप आहेत. Apple च्या अधिकार्‍यांनी सांगितले की, Apple ने मूळत: या वर्षाच्या सुरुवातीला चीनी सरकार अनुदानित YMTC चिप वापरणे सुरू करण्याची योजना आखली होती. कारण ते इतरांपेक्षा किमान 20% स्वस्त आहेत.

वॉशिंग्टनने 7 ऑक्टोबर रोजी YMTC ला जागतिक बाजाराच्या यादीतून बाहेर ठेवले होते. YMTC चिप्स सुरुवातीला फक्त चिनी बाजारात विकल्या जाणार्‍या आयफोनसाठी वापरण्याची योजना होती. Apple सर्व iPhones साठी आवश्यक असलेल्या NAND फ्लॅश मेमरीपैकी 40% पर्यंत YMTC कडून खरेदी करण्याचा विचार करत असल्‍याचेही सूत्रांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news