बायको ‘अदला-बदली’स नकार देणार्‍या पत्‍नीवर जीवघेणा हल्‍ला, राजस्‍थानमधील धक्‍कादायक प्रकार | पुढारी

बायको 'अदला-बदली'स नकार देणार्‍या पत्‍नीवर जीवघेणा हल्‍ला, राजस्‍थानमधील धक्‍कादायक प्रकार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेशमधील एक विवाहितेला पतीच्‍या विकृतीमुळे नरक यातना सोसाव्‍या लागल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्‍थानमधील हॉटेलमध्‍ये चालणार्‍या ‘बायको अदला-बदली’ प्रकारास तिने तीव्र विरोध केला. यावर संतापलेल्‍या पतीने तिच्‍यावर जीवघेणा हल्‍ला करत तिच्‍यावर अमानूष अत्‍याचारही केला. अनेक दिवसांच्‍या मानसिक व शारीरिक छळास कंटाळून  अखेर विवाहितेने नातेवाईकांच्‍या मदतीने पोलीसात फिर्याद दिली. यानंतर हा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी  पतीसह विवाहितेच्‍या सासू आणि सासर्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. तसेच  विवाहितेच्‍या तक्रारीनंतर राजस्‍थान हॉटेलमध्‍ये चालणार्‍या ‘बायको अदला-बदली खेळा’चाही पदार्फाश झाला आहे.

याप्रकरणी मध्‍य प्रदेश पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पीडित विवाहितेचा पती हा राजस्‍थानमधील बिकानेर शहरातील एका हॉटेलमध्‍ये मॅनेजर होता. तो पत्‍नीला घेवून बिकानेरला गेला. येथील हॉटेलमध्‍ये तिला एका खोलीत बंद केले. यानंतर तिला ‘बायको अदला-बदली खेळामध्‍ये सहभागी होण्‍यास सांगितले. या मागणीने प्रथम विवाहितेला प्रचंड मानसिक धक्‍का बसला. तिने अशा कोणत्‍याही प्रकारामध्‍ये सहभागी होणार नसल्‍याचे सांगितले. बिथरलेल्‍या पतीने तिचा मोबाईल हिसकावून घेत हॉटेलच्‍या एका खोलीत कोंडले.

विवाहितेवर अमानूष अत्‍याचार

विवाहितेने फिर्यादीत म्‍हटलं आहे की, मला हॉटेलच्‍या एका खोलीत कोंडण्‍यात आले. पतीने माझा फोनही काढून घेतला. त्‍यामुळे मला नातेवाईकांशी संपर्क साधता आला नाही.  दोन दिवसानंतर पती मद्यधुंद अवस्थेत खोलीत आला. दारू पिणे, ड्रग्ज घेणे, वेगवेगळ्या व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणे. मुली आणि मुलांशी लैंगिक संबंध ठेवणे सामान्य असल्‍याचे त्‍याने सांगितले. त्‍याने पुन्‍हा एकदा मला बायको अदला-बदली खेळात सहभागी होण्‍यास सांगितले. मी त्‍याला नकार दिला. त्‍याने शिवीगाळ करत जीवघेणा हल्‍ला केला.

सासू-सासर्‍यांकडूनही छळ

राजस्‍थानहून सासरी परतल्‍यानंतर विवाहितेने सासू-सासर्‍यांना राजस्‍थानमध्‍ये घडलेला  प्रकार सांगितला. यानंतर पतीसह सासू आणि सासर्‍यांनी ५० लाख रुपये माहेरहून घेवून येण्‍याची मागणी केली. सासू-सासर्‍यांनी तिच्‍या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. उलट तिच्‍यावर चरित्रहीन असल्‍याचा आरोप केला. यानंतर काही दिवस पत्‍नीकडून सातत्‍याने मारहाण सुरुच राहिली.

अखेर अमानूष अत्‍याचाराला कंटाळून विवाहिता माहेरी गेली. यानंतर तिने नातेवाईकांच्‍या मदतीने पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी पती, विवाहितेचे सासू अणि सासरे यांच्‍यावर कलम ३७७, ४९८अ, ३२३, ५०६, ३४, ३/४ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती स्‍थानिक पाेलिसांनी दिली.

हेही वाचा : 

Back to top button