HDFC पुढील वर्षी NIFTY 50 मध्ये नसणार - हे आहे कारण (HDFC may bow out of Nifty50) | पुढारी

HDFC पुढील वर्षी NIFTY 50 मध्ये नसणार - हे आहे कारण (HDFC may bow out of Nifty50)

HDFC पुढील वर्षी NIFTY 50 मध्ये नसणार - हे आहे कारण

पुढारी ऑनलाईन – HDFC बँक आणि Housing Development Finance Corporation (HDFC) चे विलीनीकरण लवकरच होत असल्याने HDFC पुढील वर्षी Nifty 50 या निर्देशंकातून बाहेर पडेल. NSE आणि BSE यांच्या निर्देशंकातून विलीनकरण, ताबा घेतलेल्या आणि विलीनीकरण रद्द करण्यात आलेल्या कंपन्यांचे शेअर्स काढून टाकते, असा आतापर्यंतचा प्रघात आहे. (HDFC may bow out of Nifty50)

भागदारकांच्या मीटिंगमध्ये विलीनकरणचा निर्णय झाल्यानंतर NSE आणि BSE असा निर्णय घेते. HDFCची ही बैठक २५ नोव्हेंबरला होणार आहे.

मनीकंट्रोल या वेबसाईटने Nuvama Wealth Managementचे तज्ज्ञ अभिलाष पगारिया यांचे मत या वृत्तात नोंदवले आहे. पगारिया म्हणतात, “HDFCचा शेअर NIFTY च्या निर्देशंकातून बाहेर काढला जाईल. जानेवारी २०२३च्या मध्यापर्यंत हा निर्णय होणे अपेक्षिता आहे.

बेंचमार्क निर्देशंकातून बाहेर पडल्याचा परिणाम HDFCच्या शेअरच्या किंमतीवर होऊ शकतो, असे तज्ज्ञांना वाटते. या विलीनकरणामुळे HDFC चे २५ शेअर असलेल्या भागदारकांना HDFC बँकेचे ४२ शेअर्स मिळणार आहेत. पण HDFC बँक मात्र Nifty 50 मध्ये असेल, असे पगारिया यांनी म्हटले आहे. ताबा घेणारी कंपनी ही निर्देशंकातून काढली जात नाही, असे पगारिया यांनी म्हटले आहे. त्यामुळे HDFC बँकेच्या शेअरचे वजन Nifty 50 मध्ये वाढू शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.

HDFC ची NIFTY 50 मधील जागा Pidilite Industries, Ambuja Cements किंवा Tata Power यापैकी एक कंपनी घेऊ शकेल, असा अंदाज आहे.

BSEवर कसा परिणाम होईल?

NSEला असा निर्णय घेण्यासाठी गुंतवणुकदारांच्या बैठकीत होणारा निर्णय पुरेसा असते. पण बाॅम्बे स्टॉक एक्सचेंज मात्र अशा विलीनीकरणाच्या तारखेला हा निर्णय घेते.

हेही वाचलंत का?

Back to top button