US President On Pakistan : पाकिस्‍तान जगातील सर्वात धोकादायक देश : अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बायडेन यांची स्‍पष्‍टोक्‍ती | पुढारी

US President On Pakistan : पाकिस्‍तान जगातील सर्वात धोकादायक देश : अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बायडेन यांची स्‍पष्‍टोक्‍ती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तान हा जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक आहे. या देशाने कोणताही सामंजस्‍याचा विचार न करता अण्‍वस्‍त्र बाळगली आहेत, अशा शब्‍दांमध्‍ये अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांनी पाकिस्‍तानवर हल्‍लाबाेल केला. ( US President On Pakistan ) अमेरिकेतील मध्‍यावधी निवडणुकीसाठी निधी गोळा करण्‍यासाठी आयाेजित कार्यक्रमात ते बोलत होते.

US President On Pakistan :  बायडेन यांनी साधली अचूक वेळ

ज्‍यो बायडेन यांनी केलेल्‍या विधानाची वेळ अचूक आहे. कारण पाकिस्‍तानचे लष्‍कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे सध्‍या अमेरिका दौर्‍यावर आहेत. त्‍यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि राजकीय नेत्‍यांची भेटही घेतली आहे. या भेटींमुळे पाकिस्‍तान आणि अमेरिकेतील संबंध अधिक दृढ होण्‍यास मदत होईल, असे मानले जात होते. मात्र बायडेन यांनी बाजवा अमेरिकेमध्‍ये असतानाच पाकिस्‍तानच्‍या दुटप्‍पीपणाची पोलखोल केल्‍याने पाकिस्‍तानला हा मोठा धक्‍का आहे. तसेच या दोन देशांमधील मतभेदही चव्‍हाट्यावर आले आहेत.

रशियाबरोबर मैत्रीमुळे हंगेरीवरही हल्‍लाबोल

हंगेरीचे पंतप्रधान विक्‍टर ऑरबन हे रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतीन यांचे निकटवर्ती मानले जातात. या दाेन्‍ही देशांमधील मैत्रीवर बायडेन यांनी या वेळी आक्षेप नाेंदवला.  तुम्‍ही जगभरातील लोकशाहीचे महत्त्‍व यावरील चर्चा पाहा. हंगेरी हा देश नाटोचा सदस्‍य आहे. मात्र या देशातील लोकशाही कशी आहे हे सांगून मी तुम्‍हाला कंटाळा आणू शकतो, असा टोलाही बायडेन यांनी या वेळी लगावला.

हेही वाचा : 

Back to top button