रशियाने युक्रेनविरुद्ध अण्वस्त्राचा वापर केल्‍यास अमेरिकेचा ‘प्‍लॅन’ तयार : ज्‍यो बायडेन

US President Threaten
US President Threaten

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरुद्‍ध अण्वस्त्राचा वापर केल्‍यास त्याला सडेतोड उत्तर देण्‍यासाठीचा अमेरिकेचा 'प्‍लॅन' तयार आहे, असे अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांनी स्पष्‍ट केले आहे. 'सीएएन' या वृत्तसंस्‍थेला मुलाखत देताना ते बोलत होते.

या वेळी बायडेन म्‍हणाले, रशियाने युक्रेनविरुद्ध अण्वस्त्राचा वापर केल्‍यास आम्‍ही काय करणार याबाबत आताच बोलणे बेजबाबदारपणाचे होईल. मात्र अशावेळी पेंटॅगॉनला ( अमेरिकेच्‍या सुरक्षा संस्‍थेचे मुख्‍यालय ) आदेशाची वाट पाहण्‍याची गरज भासणार नाही, असे सूचक विधान करत रशियन नेता अण्वस्त्र वापर करण्‍याचा विचार करेल असे वाटत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मागील आठवड्यात युक्रेन -रशिया युद्‍धाबाबत बोलताना बायडेन म्‍हणाले होते की, रशियाचे पुढील धोरण काय आहे याची कल्‍पना नाही. तर युक्रेनचे अध्‍यक्ष झेलेन्‍स्‍की म्‍हणाले होते की, युक्रेनला सर्व मदत करण्‍याची अमेरिकेच्‍या अध्‍यक्षांनी तयारी दर्शवली आहे. तसेच मित्रराष्‍ट्रांनाही पाठिंबा येण्‍याची ग्‍वाही दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news