Bushra Bibi : इम्रान खान यांच्‍या पत्‍नीची ऑडिओ क्लिप व्‍हायरल, पाकिस्‍तानमध्‍ये खळबळ | पुढारी

Bushra Bibi : इम्रान खान यांच्‍या पत्‍नीची ऑडिओ क्लिप व्‍हायरल, पाकिस्‍तानमध्‍ये खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्‍नी बुशरा बीबी (Bushra Bibi ) यांची ऑडिओ क्‍लिप व्‍हायरल झाल्‍याने पाकिस्‍तानमध्‍ये खळबळ उडाली आहे. बुशरा बीबी (Bushra Bibi ) यांची ही कथित ऑडिओ क्‍लिपमध्‍ये इम्रान खान यांच्‍या पक्षाला विरोध कणार्‍याचा प्रचार देशद्रोही म्‍हणून करा, अशी सूचना करण्‍यात आली आहे.

Bushra Bibi : सोशल मीडियावर देशद्रोही हॅशटॅग चालवा

ही ऑडियो क्‍लीप बुशरा बीबी आणि पाकिस्‍तान तहरीक -ए-इन्‍साफ पार्टीच्‍या ( पीटीआय ) सोशल मीडिया प्रमुख डॉ.अर्सलान खालिद यांच्‍यामधील संवादाची आहे. यावेळी बुशार बीबी म्‍हटलं आहे की, ‘पीटीआय’ला विरोध करणार्‍यांविरोधात सोशल मीडियावर देशद्रोही हॅशटॅग चालवण्‍यास यावे, असा आदेश इम्रान खान यांनी दिला आहे. इम्रान खान आणि त्‍यांचे मित्र फराह गान यांची प्रतिमा बिघडविणार्‍यांना देशद्रोही घोषित करा, असेही या ऑडियो क्‍लिपमध्‍ये म्‍हटले आहे

डॉ. खालिद आणि बुशरा बीबी यांचा संवाद सुरु झाल्‍यावर त्‍या प्रश्‍न विचारतात की पीटीआयचा सोशल मीडिया विंग निष्‍क्रिय का झाला आहे. आता सक्रीय व्‍हावा. जो कोणी इम्रान खान यांच्‍यावर टीका करेल ती देशद्रोहाशी जोडा. तसेच पाकिस्‍तानमधील शहबाज शरीफ सरकार रशियाकडून पेट्रोल आणि डिझेल का खरेदी करत नाही, हाही मुद्‍दा उचलून धरा. हे मुद्‍दे तुम्‍ही नेहमी चर्चेत ठेवा. तसेच हेही लक्षात ठेवा की हे मुद्‍दे नेहमीच जिंवत ठेवले पाहिजेत.

नुकतेच माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्‍लामाबादमधील परेड ग्राउंडवर एक सभा घेतली होती. यवेळी त्‍यांनी पाकिस्‍तानमधील वाढती महागाई, राजकीय अस्‍थिरता, वीज संकट आणि पेट्रोल-डिझेल किंमतीमध्‍ये झालेली वाढ या मुद्‍यांवर शरीफ सरकारवर हल्‍लाबोल केला होता. एप्रिल २०२२ मध्‍ये विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्‍यावर अविश्‍वास प्रस्‍ताव आणला होता. त्‍यामुळे त्‍यांना पंतप्रधान पदावरुन पायउतार व्‍हावे लागले होते.परकीय शक्‍तींनी कट रुचून आपल्‍याला पंतप्रधान पदावरुन हटविल्‍याचा आरोप त्‍यांनी केला होता.

 

 

Back to top button