Fake Astronaut : ‘तुझ्यावर खूप प्रेम आहे…’ 65 वर्षीय ‘फेक अंतराळवीराकडून’ जपानी महिलेची 24 लाखांना फसवणूक | पुढारी

Fake Astronaut : 'तुझ्यावर खूप प्रेम आहे...' 65 वर्षीय 'फेक अंतराळवीराकडून' जपानी महिलेची 24 लाखांना फसवणूक

पुढारी ऑनलाईन डेस्क :  इंन्स्टाग्रामवर ओळख झाली. नंतर मैत्री. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. नंतर त्याने संदेश पाठवले. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करायचे आहे, पृथ्वीवर परतण्यासाठी पैशांची गरज आहे, असे म्हणत एका जपानी महिलेची बनावट अंतराळवीराने (Fake Astronaut) 24 लाख रुपयांनी फसवणूक केली. हा बनावट अंतराळवीर 65 वर्षांचा म्हातारा आहे. जपानच्या टीव्ही असाहीने याचे वृत्त दिले आहे.

Fake Astronaut : माझे तुझ्यावर प्रेम आहे…

जपानच्या शिगा प्रीफेक्चर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेची जूनमध्ये इंन्स्टाग्रामवर एका व्यक्तीसोबत भेट झाली. त्याने आपली ओळख आपण एक अंतराळवीर असल्याची करून दिली. त्याने इन्स्टाग्रामवर तशा पद्धतीच्या पोस्ट टाकून आपण स्पेस स्टेशनवर काम करत असल्याचा खोटा आभास निर्माण केला. त्यामुळे महिलेला तो अंतराळवीर असून स्पेस स्टेशनवर काम करत आहे याची खात्री पटली. नंतर जपानी मेसेजिंग अॅपवरून दोघांमध्ये संदेशाची देवाण-घेवाण सुरू राहिली. त्यानंतर त्या व्यक्तिने तिला आपले तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यासाठी पैसे लागतील. तो तिला म्हणाला की,” मला जपानमध्ये तुझ्यासोबत नवीन जीवन सुरू करायचे आहे. पण त्यासाठी मला पैसे हवे आहेत. स्पेस स्टेशनवरून पृथ्वीवर परत येण्यासाठी आणि जपानमध्ये रॉकेट लँडिंगसाठी फी भरावी लागेल.”

24 लाख रुपयांचा गंडा

त्याच्या या कथित दाव्याला ही महिला बळी पडली. योमिउरी शिंबुन यांच्या म्हणण्यानुसार, तिने 19 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान, 5 हफ्त्यांमध्ये एकूण 4.4 दशलक्ष येन भारतीय जलनात एकूण 24 लाख रुपये पाठवले. मात्र, या पुरुषाने तरीही आणखी पैसे लागतील असे सांगून पैशांची मागणी सुरूच ठेवली. त्यामुळे तिला संशय आला आणि तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली.पोलिस तपासात तिची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. तो व्यक्ति कोणताही अंतराळवीर नसल्याचे समजले. जपानच्या आंतरराष्ट्रीय प्रणय घोटाळा म्हणून ही केस हाताळली जात असल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button