Life Style : आळस कसा दूर करावा? जाणून घ्या ‘या’ अगदी सोप्या पद्धती

Life Style : आळस कसा दूर करावा? जाणून घ्या ‘या’ अगदी सोप्या पद्धती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : अनेक जणांना आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात. त्यानुसार ते वेळापत्रक देखील तयार करतात. मोटिव्हेशनल स्पीकरचे एखादे भारी झक्कास व्याख्यान ऐकल्यानंतर एकदम उत्तेजित होतात. आपण खूप काही करूया… पण एक दोन दिवसातच संचारलेला उत्साह ओसरून जातो. का तर कोणत्याही गोष्टीत सातत्य राखण्यासाठी आयुष्यातून एका गोष्टीला दूर करता यायला हवे ती गोष्ट म्हणजे आळस. ब-याचदा आपण एखादी गोष्ट करायला घेतो. पण नंतर-नंतर आळस येतो आणि आपण मग जाऊ द्या आज नको उद्या, उद्या नको पर्वा… असे करत टाळत राहतो. म्हणूनच 'आळस' हा माणसाचा मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. कारण तो मनुष्याला कर्म करण्यापासून रोखतो.

मुळात आळस का निर्माण होतो. याचे कारण शोधून काढून मग उपाय केले तर आळस आपल्याला आडकाठी करणार नाही. त्यासाठी स्वतःचे निरीक्षण करणे फार गरजेचे आहे. आळस हा अतिरिक्त शारीरिक श्रमामुळे उद्भवते. तसेच मानसिक थकवा देखील आळसाचे मुख्‍य कारण आहे. त्याचप्रमाणे आजकालची आपली Life Style देखील आळसाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. जसे की आपला आहार! फास्ट फूड, जंक फूड, हॉटेलमधील जेवण रेडीमेड फूड हा सर्व आघार त्यातील घटकांमुळे माणसाला सुस्त करतो. सुस्त शरीर हे आळसाला कारणीभूत असते.

आहाराव्यतिरिक्त आळस येण्यासाठी आपल्या Life Style मधील आणखी एक भाग म्हणजे आपले कपडे. आज आपल्याला खूप जास्त टाईट कपडे घालण्याची सवय जडली आहे. खूप जास्त टाईट कपडे जास्त कालावधीसाठी घातल्याने शारीरिक थकवा निर्माण होतो. ज्यामुळे आपण थोडे काम केल्यानंतर लगेच थकतो. नंतर पुन्हा दुसरे कोणते काम करण्यासाठी आपल्यामध्ये आळस निर्माण होतो. अशी एक ना अनेक कारणे आहेत.

Life Style : आळस दूर करण्यासाठी हे साधे उपाय करा

झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर सकारात्मक सूचना द्या

आळस दूर करून संपूर्ण दिवस न थकता उत्साहाने कार्यरत राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर स्वतःला सकारात्मक सूचना द्या. जसे, मी खूप उत्साही आहे. मी खूप सक्रीय आहे. माझे संपूर्ण लक्ष माझ्या कामावर असते. त्यामुळे मी कोणतेही काम वेळेत पूर्ण करतो. उरलेला वेळ मी माझे छंद जोपासण्यासाठी घालवतो. अशा सकारात्मक सूचना स्वतःला दिल्याने आळस दूर होण्यासाठी मदत होते.

Life Style : 'गढुळस्करण' किंवा ऑइल पुलिंग तंत्र

ही एक प्राचीन आयुर्वेदिक पद्धती आहे. ही फक्त ॲक्टिव्ह किंवा उत्साही राहण्यापूरती केली जाते असे नाही. तर अन्य अनेक मौखिक किंवा दातांच्या समस्यांवरही हे प्रभावी ठरते. गढुळस्करण करणे हे खूप सोपे असते. यात कोणतेही मोठे काम नाही. मात्र हे करताना तुम्हाला सावधगिरी बाळगणे देखिल गरजेचे आहे. गढूळस्करणलाच इंग्रजीत Oil Pulling म्हणतात. याविषयी अनेक व्हिडिओ तुम्हाला
यु ट्यूबवर पाहायला मिळतील. ते पाहून योग्य प्रकारे केल्यास याचे शरीराला फायदे मिळतात.

असे करा 'गढुळस्करण'

1. तिळाचे, सुर्यफूलाचे किंवा नारळाचे तेल यापैकी कोणतेही तेल वापरू शकता. तेल शक्यतो कच्च्या घाण्याचे वापरावे रिफाइंड वापरू नये ते शरीरासाठी घातक असते.
2. सकाळी दात घासण्यापूर्वी एक ते दोन चमचे तेल तोंडात घ्या आणि गुळण्याकरतो तसे करून नंतर थुकून द्या.
3. त्यानंतर साध्या कोमट पाण्याने गुळण्या करावे नंतर ब्रश करून घ्यावे.
4. तेल कुठल्याही परिस्थितीत पोटात जाणार नाही याची काळजी घ्या.
4. दररोज हे केल्यास तुम्हाला आळस दूर होऊन जास्त फ्रेश वाटेल तुम्ही अधिक उत्साहाने कार्य कराल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news