अफगाणिस्तान : काबुलमध्ये शैक्षणिक संस्थेवर आत्मघाती हल्ला; १०० ठार | पुढारी

अफगाणिस्तान : काबुलमध्ये शैक्षणिक संस्थेवर आत्मघाती हल्ला; १०० ठार

अफगाणिस्तान : काबुलमध्ये शैक्षणिक संस्थेवर आत्मघाती हल्ला; १९ ठार

पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानाची राजधानी काबुलमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान १०० विद्याराथी ठार झाले आहेत. मृतांत बहुतांश तरुण महिलांचा समावेश आहे. काबुलमधील एका शैक्षणिक संस्थेवर हा हल्ला झाला. काज या शैक्षणिक संस्थेवर हा हल्ला झाला. अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक हाजारा समूदायातील लोक या संस्थेत शिक्षण घेतात. (kabul explosion education center)

स्थानिक पत्रकार बिलाल सरवरी यांनी याबाबत ट्विट केले आहे की, आतापर्यंत  १०० विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत. मारल्या गेलेल्या लोकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांची प्रवेश परिक्षा सुरू होती. वर्ग खचाखच भरलेला होता. त्यामुळे या आत्मघाती हल्ल्यात अनेक विद्यार्थी ठार झाले आहेत.

या परिसरातील पोलिसांचे प्रवक्ते खालिद झरदान यांनी या स्फोटाची माहिती दिली. या हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही.

काबुलमध्ये बाँबस्फोट, आत्मघाती हल्ले यांची संख्या वाढलेली आहे. या महिन्याचा सुरुवातीला रशियन दूतावासाबाहेर झालेल्या हल्ल्यात सहा नागरिक ठार झाले होते. तर ऑगस्टमध्ये एका मशिदीबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात २१ लोक ठार झाले होते.

हेही वाचा

Back to top button