Taliban Government : तालिबान्‍यांचा आदेश ‘ दाढी असेल तरच सरकारी..” | पुढारी

Taliban Government : तालिबान्‍यांचा आदेश ' दाढी असेल तरच सरकारी.."

 

पुढारी ऑललाईन डेस्‍क

तालिबान्‍यांनी ऑगस्‍ट २०२१ मध्‍ये अफगाणिस्‍तानमधील  सत्ता काबीज केली. ( Taliban Government ) यानंतर महिलांवर अनेक जाचक अटी लादल्‍या गेल्‍या. तसेच पुन्‍हा एकदा अनेक जाचक नियमाची अंमलबजावणी सुरु केली आहे. आता तालिबान्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे की, देशात सरकारी कर्मचार्‍यांना दाढी वाढवणे सक्‍तीचे असेल. दाढी असेल तरच सरकारी कर्मचार्‍यांना कार्यालयात प्रवेश दिला जाईल. या नियमाचा भंग करणार्‍यांना कार्यालयात घेतले जाणार नाही. या नियमाची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

Ayush Badoni : आयपीएलच्या पदार्पणातच मैदान गाजवणारा ‘हा’ २२ वर्षीय तरूण आहे तरी कोण?

‘द खामा प्रेस’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, तालिबान सरकारने सोमवारपासून आणखी एका आदेशाची अंमलबजावणी सुरु केली. आता दाढी असेल तरच सरकारी कार्यालायत कर्मचार्‍यांना प्रवेश दिला जाणार आहे. वित्त मंत्रालयाच्‍या काही कर्मचार्‍यांना कार्यालयाच्‍या प्रवेशव्‍दारावरच रोखण्‍यात आले. दाढी नसल्‍याने त्‍यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्‍यात आला. यापूर्वी सरकारी कर्मचार्‍यांना टोपीचीसक्‍ती करण्‍यात आली होती. आता दाढीसक्‍ती निर्णयावर तालिबान समर्थकही टीका करत आहेत. इस्‍लाममध्‍ये दाढीचीसक्‍ती नाही. तसेच आजपर्यंत कोणत्‍यााही सरकारने असा अजब आदेश दिलेला नाही, अशा प्रतिक्रिया दिल्‍या जात आहेत.

Taliban Government महिलांवर अनेक जाचक अटी

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबान्यांनी अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत केली. यानंतर महिलांवर जाचक अटी घालण्यास सुरूवात केली आहे. पहिल्यांदाच मुलींची शाळा काढण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच महिलांवर नवी बंधनं घालत मुलींच्या शाळा सुरू करण्याची परवानगी नाकारली. देशातील महिलांनी बुरखा परिधान करणे सक्‍तीचे केले. तसेच महिलांनी एकट्याने विमानात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, “तालिबान्यांनी सर्व एअरलाईन्सना आदेश दिलेले आहेत की, आता महिलांना पुरुष नातेवाईक असेल तर विमानात प्रवेश देण्यास परवानगी द्यावी.”

हेही वाचा :

 

 

Back to top button