Relationship : रिलेशनशीपमध्ये पुरुषांना पार्टनरकडून काय अपेक्षा असतात?

Relationship : रिलेशनशीपमध्ये पुरुषांना पार्टनरकडून काय अपेक्षा असतात?
Relationship : रिलेशनशीपमध्ये पुरुषांना पार्टनरकडून काय अपेक्षा असतात?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत हा असा देश आहे की, जिथं आजही लोक आपल्या खासगी आयुष्याबद्दल आणि रिलेशनशीपबद्दल (Relationship) खुलेपणाने बोलत नाही. समाजातून एक वेगळंच दडपण त्यांच्यात जाणवतं. त्यामुळेच हातात आलेल्या स्मार्टफोनचा आणि त्यातील डेटिंग अ‍ॅप्स वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

खरंतर डेट करणं, ही लग्नाच्या पूर्वीची मनाला आनंद आणि सुख देणारी बाब आहे. OkCupid नावाच्या अ‍ॅपने एक आकडेवारी समोर आणली आहे. रिलेशनशीपमध्ये आपलं नातं कसं जपतात, कसे व्यक्त होतात, आपल्या जोडीदारा किती महत्व देतात, त्याच्याकडून कोणत्या अपेक्षा करतात, या सर्वांबद्दल या अ‍ॅपने माहिती दिली आहे.

बायको किंवा गर्लफ्रेन्डकडून पुरुष पार्टनरला नेमकं काय पाहिजे असतं? 

'माझा तुझ्यावर विश्वास आहे', हे वाक्य जरी घिसंपीठं वाटतं असलं तरी, गर्लफ्रेन्ड किंवा बायको उच्चारलं तरी बाॅयफ्रेन्ड किंवा नवऱ्याला आनंद देणारं असतं. कारण, त्याला वाक्य सुखावणारं असते. त्यामुळे पुरुष पार्टनरसोबत अविश्वास कधी व्यक्त करू नये, असं या डेटिंग अ‍ॅप्स निदर्षनास आलं आहे. तो विश्वासत पुरुषाला सुखावणारा असतो.

कौतुक कोणाला आवडत नाही. जसं महिलांना पुरुषांनी केलेलं कौतुक जास्त आवडतं. तसंच बायकोने किंवा गर्लफ्रेन्डने केलेलं कौतुकही पुरुषांना आनंद देऊन जाणारा क्षण ठरतो. त्याचा परिमाण असा होतो की, किमान तुमचा आठवडा तरी उत्तम जाऊ शकतो.

'तू खरंच माझ्यासाठी स्पेशल आहे किंवा इतरांपेक्षा तुझ्यात काहीतरी वेगळपण आहे', असं वाक्य जरी बायकोने किंवा गर्लफ्रेन्डने उच्चारलं तरी, पुरुष सुखावतात. त्यांनाही त्यांची असं कौतुक केलेलं आवडतं.

बऱ्याचदा रिलेशनशीपमध्ये (Relationship) भांडण होण्याचं कारण असं असतं की, आपल्या नवऱ्याला किंवा बाॅयफ्रेन्डला बदलण्याचा प्रयत्न केला जातो. नेमकीच तीच गोष्ट त्यांना आवडत नाही. शेवटी त्रागा होतो. आपण जसे आहोत, तसेच समोरच्या व्यक्तीने आपल्याला स्वीकारलं पाहिजे, अशी आशा पुरुषांच्या मनात तयार होते, त्यातून होतं काय तर, दोघांच्यात खटके उडतात. त्यामुळे बायकोने किंवा गर्लफ्रेन्डने किमान आठवड्यातून एकदा तरी म्हणावं की, 'तू जसा आहे तसाच मला खूप आवडतोस', हे वाक्य उच्चारून बघा… रिलेशनशीप कसं टिकतं ते…

ही महत्वाची निरीक्षणं या अ‍ॅप्सने नोंदविल्यानंतर पुढे काही प्रश्न युजर्नना विचारली त्यातून आलेली आकडेवारी फार महत्वाची ठरते. तेही प्रश्न आणि उत्तरं आपण पाहू…

तुम्ही रिलॅक्स कधी फिल करता? 

या अ‍ॅप्सवाल्यांनी आपल्या युजर्सना विचारलं की, तुम्ही रिलॅक्स कधी फिल करता किंवा तुम्हाला स्वातंत्र्य कुठं आहे, असं वाटतं. युजर्सनी दिलेली उत्तर त्याचं एक सर्वेक्षण केलं. त्यातून एक बाब लक्षात आली की, ३९ टक्के लोकांनी आर्थिक बाबतीत, ३० टक्के लोकांना प्रवास करताना, २२ लोकांना सेक्स करताना, ९ टक्के लोकांना स्वतः कलांमध्ये वेळ दिल्यानंतर रिलॅक्स वाटतं.

रिलेशनशीपमध्ये पैसा की स्वातंत्र्य महत्वाचं? 

दुसरा प्रश्न असा विचारला की, पैसा की स्वातंत्र्य यामध्ये सर्वात जास्त काय आवडतं? ६५ टक्के लोकांना स्वातंत्र्य आवडतं. केवळ ३५ टक्के लोकांनी पैशाला महत्व दिलं. याचा निष्कर्ष असा आहे की, भारतीय लोकांना पैसा मिळवायचा आहे. पण, त्यांची स्वातंत्र्याशी अ‍ॅडजेस्टमेंट करायची अजिबात इच्छा नाही.

पार्टनरला किती स्वातंत्र्य देऊ इच्छिता?

आता महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे, रिलेशनशीपमध्ये (Relationship) आपल्या पार्टनरला किती स्वातंत्र्य द्यावं, असं वाटतं? त्याचं रिलेशनशीपमध्ये ६३ भारतीयांना पार्टनरला स्वातंत्र्य देणं योग्य वाटतं. दिर्घकाळ टिकलेल्या रिलेशनशीपमध्ये आपल्या पर्सनल बॅंक खात्यातून आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घेणं महत्वाचं वाटतं. सर्वात महत्वाचं असं की, भारतात २७ युजर्स असे दिसून आलं की, त्यांना जाॅईन अकाऊंटमध्ये प्राॅब्लेम्स होते.

पहा व्हिडीओ : अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री  प्रिया बापटशी गप्पा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news