भारत जगातील सर्वांत सहिष्णू देश; अरब लेखकाकडून भरभरून स्तुती

रियाध; पुढारी ऑनलाईन : भारत जगातील सर्वांत सहिष्णू देश आहे, अशी स्तुती सौदी अरेबियातील प्रसिद्ध स्तंभलेखक खलप-अल-हरबी यांनी केली आहे. हरबी यांनी सौदी गॅझेटमध्ये हा लेख लिहिला आहे. भारतात असहिष्णुता वाढत आहे, अशी टीका करण्यांसाठी हा लेख झणझणीत अंजन ठरला आहे.
हरबी त्यांच्या सहिष्णू विचारसरणीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखांना आणि विश्लेषणांना मोठा प्रतिसाद मिळतो.
भारत जगातील सर्वांत सहिष्णू देश : खरं सांगू का मला तर भारताबद्दल हेवाच वाटतो
या लेखात ते लिहितात, “भारतात १००च्यावर धर्म आहेत आणि १०० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. तरीही लोक भारतात शांततेने आणि सहचर्याने राहतात. कणखर देश उभा करण्यासाठी भारताच्या सर्व नागरिकांनी योगदान दिलं आहे. सुईपासून ते मंगळावर जाण्याच्या तयारीपासून सर्व काही भारतात बनतं. खरं सांगू का मला तर भारताबद्दल हेवाच वाटतो.
- पुणे : आई बाळाला सांभाळ! सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची बायकोच्या ओढणीने आत्महत्या
- जिल्हा सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया, अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबरला
कारण मी अशा जगात राहतो, जिथं फक्त एकच धर्म आहे आणि एकच भाषा बोलली जाते, पण सर्वत्र हिंसाच दिसते.”
“जग सहिष्णुतेबद्दल कशाही प्रकारे बोलू दे. धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि वांशिक पातळीवर भारत सहजीवन, शांतता आणि सहिष्णुता यांची सर्वांत जुनी आणि महत्त्वाची शाळा आहे.”
ते पुढे म्हणतात, “भारताचे ठोकळेबाज चित्र आपल्या नजरेसमोर येते, ते गरिबी आणि मागासलेपण याच्याशी जोडलेलं आहे. पण हे चित्र खोटे असून याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही.”
- Panjshir Valley : तालिबानला पहिला दणका, पंजशीर खोऱ्यातील संघर्षात ३०० दहशतवाद्यांचा खात्मा
- पाकिस्तान शेजारी ‘पाकिस्तान’
अल हरबी, “आपल्या नजरेसमोर असं जे चित्र निर्माण होतं, ते आपण गोष्टींबद्दल तीव्र स्वरुपाचे अंदाज बांधतो. कच्चा तेलाच्या पूर्वी आपण गरीब होतो तेव्हा भारताचं आपल्या डोळ्या समोरील चित्र हे श्रीमंतीचं होतं.
पण जेव्हा आपली आर्थिक स्थिती सुधारली तेव्हा मात्र आपण भारताचं चित्र गरीब आणि मागासलेपणाशी जोडलं.”
पण आपण जर विवेकबुद्धीने विचार केला तर आपल्या मनात भारताच गरीब किंवा श्रीमंत असं चित्र येणार नाही.
उलट विविध विरोधी विचार आणि विचारधारा यांना एकत्र बांधण्याच्या भारताच्या क्षमतेमुळे आपण प्रभावित झालं पाहिजे.
ते म्हणतात, “आपण एक प्रयोग करू. जगातील सर्व अरब लोकांना भारतात पाठवू. त्यांची एकूण संख्या पाहता, भारतात ते अल्पसंख्याकच असतील. पण ते भारताच्या निर्भय लोकांच्या समुद्रात मिसळून जातील.
- Delta variant : लस घेतल्यानंतरही सोडत नाही डेल्टा व्हेरिएंट, अँटीबॉडीजची ताकदही कमी करतो!
- दूध एफआरपी : कायदा हवाच, साखर आयुक्तालयाची सूचना
त्यांच्यातील राष्ट्रीय आणि अतिरेकी भावनाही त्यांच्यासोबतच मिसळून जाईल. आणि त्यांच्या लक्षात येईल की जगातील कोणतीही शक्ती आपल्याच बांधवांच्या हत्येचं समर्थन करणार नाही.”
सहिष्णुता हे भारताच्या डीएनएमध्येच
ते सांगतात सहजीवन आणि सहिष्णुता हे भारताच्या डीएनएमध्येच आहे.
ते लिहितात, “भारत जगातील सर्वांत मोठी आणि सर्वांत जुनी लोकशाही आहे.
भारतात वेगवेगळे धर्म किंवा वंश यांच्यात फार मोठा भेद आहे, अशी भारताची कधी ओळख नाही.
श्रीमंत आणि गरीब असा द्वेषही भारतात नाही. भारताने महात्मा गांधीचा सन्मान केला. त्याच वेळी ब्रिटिशांची सन्मान केला.”
“भारतीय लोकांची थोरवी मोठी आहे, त्याचे इतरही वेगळेपण आहेत. ज्यांच्या मनात द्वेष भरलेला आहे ते सोडून बाकीचे सर्व लोक हे मान्य करतील.”
हे ही वाचलं का?