Iran Earthquake : इराण भूकंपाने हादरले, ५ ठार, १९ जखमी | पुढारी

Iran Earthquake : इराण भूकंपाने हादरले, ५ ठार, १९ जखमी

पुढारी ऑनलाईन : इराणच्या एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आज पहाटे 3 वाजता दक्षिण इराणमध्ये ६ रिश्टरचा स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात ५ नागरिकांचा मृत्यू झाला तर १९ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या भूकंपाचे धक्के होर्मोझगान प्रांतातील बंदर अब्बास शहराच्या नैऋत्येस 100 किलोमीटर (60 मैल) अंतरापर्यंत बसले असल्याचे यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने म्हटले आहे.

या भूकंपामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आणि १९ जण जखमी झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त नुकसान भूकंपाच्या केंद्राजवळ असलेल्या सयेह खोस्ट या गावात झाले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये याच होर्मोझगान प्रांतात ६.४ आणि ६.३ रिश्टर स्केलच्या झालेल्या दोन भूकंपात एकाचा मृत्यू झाला होता, अशी माहिती दिल्याचे वृत्त होर्मोझगानचे गव्हर्नर महदी दोस्ती यांनी दिल्याचे IRNA ने वृत्त दिले आहे.

हेही वाचा:

Back to top button